crime news, police, nagpur saam tv
महाराष्ट्र

Crime News : दाेस्त दाेस्त ना रहा ! मित्रास घरी जेवायला बोलावलं अन् त्याच्या घरी जाऊन...

या घटनेचा तपास अवघ्या काही तासांत पाेलिसांनी लावला.

मंगेश मोहिते

Nagpur Crime News : मित्राला स्वतःच्या घरी जेवायला बोलावलं आणि त्याच्या बंद घरात जाऊन सोन्याच्या दागिन्यांसह इतर साहित्याची चोरी केल्याची घटना नागपूरात (Nagpur) घडली आहे. पाचपावली पोलीस ठाण्यातील पाेलिसांनी संशयित आराेपीस अटक (arrest) केली आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार कैलास निमजे याने आपल्या मित्राला परिवारासहित आपल्याकडे जेवायला यायला सांगितलं. त्यानंतर मित्र परिवारासह कैलास यांचा घरी पाेहचला. त्यावेळी कैलासनं मित्रास एक तातडीचं काम आल्याच सांगत आपल्याच घरी थांबवून तो बाहेर गेला.

कैैलासनं त्याच्या मित्राच्या घरी जाऊन त्याच्या घराचे कुलूप खोलत घरातील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. पुन्हा ताे आपल्या घरी परतला. त्याने मित्रासोबत जेवण केलं. दरम्यान मित्र जेव्हा स्वतःच्या घरी पोहोचला. त्यावेळी त्याला घरात चोरी झाल्याचं लक्षात आलं.

त्याने पोलिसात तक्रार केली. दरम्यान कैलास याच्या मित्रानं दिलेल्या तक्रारीनंतर पाेलिसांनी तपास करीत कैलासला ताब्यात घेतलं अशी माहिती रवी नागोसे (पीएसआय, पाचपावली पोलीस ठाणे) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरीक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT