Kolhapur News Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur : कोल्हापुरात महाप्रसादातून विषबाधा; २५० पेक्षा अधिक भाविकांना उलट्या-जुलाबाचा त्रास

Kolhapur News : कोल्हापुरात दत्तजयंतीच्या महाप्रसादातून विषबाधेची धक्कादायक घटना. २५० हून अधिक नागरिकांना उलट्या-जुलाबाचा त्रास, आरोग्य यंत्रणा सतर्क. नमुने तपासणीसाठी पाठवले.

Alisha Khedekar

  • दत्तजयंती महाप्रसादातून विषबाधा;

  • २५० पेक्षा अधिक नागरिक रुग्णालयात

  • लहान मुले, महिला, पुरुष आणि वृद्ध सर्वजण बाधित

  • आरोग्य विभागाची तातडीची पथके गावात दाखल

  • नेमके कारण लवकरच स्पष्ट होणार

  • नागरिकांना घाबरून न जाता उपचार घेण्याचे आवाहन

कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी सांबरे (ता. गडहिंग्लज)मध्ये धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी दुपारी एका कार्यक्रमानंतर झालेल्या महाप्रसादातून विषबाधा झाल्याची गंभीर घटना घडली. या घटनेत लहान मुले आणि महिलांसह तब्बल २५० हून अधिक नागरिक बाधित झाले असून, त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. या घटनेमुळे संपूर्ण सांबरे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांबरे गावात शुक्रवारी सकाळी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आजूबाजूच्या १० ते १५ गावांमधील नागरिक सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हा प्रसाद खाल्ल्याने अनेक नागरिकांना दुपारपासून उलट्या, पोटदुखी, मळमळ आणि जुलाब यासारखे त्रास जाणवू लागले. प्राथमिक अंदाजानुसार, विषबाधा झालेल्या नागरिकांची संख्या २५० पेक्षा अधिक आहे. या बाधितांमध्ये लहान मुले, महिला, पुरूष व वृद्धांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.

एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने लोक आजारी पडल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. बाधित रुग्णांना तातडीने रुग्णवाहिकांसह मिळेल त्या वाहनांतून वेगवेळ्याठिकाणी आरोग्य केंद्र तसेच उपजिल्हा रुग्णालय आणि खासगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील अनेक रुग्णांवर तातडीने उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले. आरोग्य विभागाने त्वरित गावात पथके पाठवली असून, घरोघरी जाऊन तपासणी सुरू केली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक चंद्रकांत खोत, तालुका आरोग्य अधिकारी गीता कोरे यांच्यासह आरोग्य अधिकार्‍यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन बाधितांवर उपचारासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता, त्रास जाणवल्यास त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. विषबाधेचे नेमके कारण काय आहे, हे निश्चित करण्यासाठी महाप्रसादाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बैलगाडा शर्यतीत थरार! बैलाची घोडीवरून उडी; मोठा अपघात टळला

New Labour Code: वर्षभरात ग्रॅच्युटी, बेसिक सॅलरी वाढणार; बुधवारपासून नवा कामगार कायदा,वाचा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे

Kuwait attack news: मोठी बातमी! कुवैतमधील वीज प्रकल्प उद्ध्वस्त, भारतीय कामगाराचा मृत्यू

Sun Tan Removal Tips: 3 दिवसात गायब होईल चेहऱ्यावरचं टॅनिंग, हा देसी उपाय नक्की करून पाहा

रूपाली चाकणकरांचे रायगड कनेक्शननंतर राज्यात पुन्हा खळबळ; नेमके प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT