osmanabad dcc bank saam tv
महाराष्ट्र

Osmanabad DCC Bank: उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतमाेजणीस प्रारंभ; महाविकासची सरशी, भाजपला भाेपळा

रविवारी झाले हाेते मतदान.

साम न्यूज नेटवर्क

-कैलास चाैधरी

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (osmanabad district cooperative bank) निवडणुकीच्या (election) मतमाेजणीस आज (साेमवार) प्रारंभ झाला. या जिल्हा बॅंकेच्या पाच जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 10 जागांसाठी रविवारी मतदान झालं. 808 मतदारांपैकी 798 मतदारांनी त्यांचा हक्क बजावला. येथील महसूल भवन येथे मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर पहिला निकाल हाती आला आहे. (osmanabad dcc bank election result latest news in marathi)

उस्मानाबाद (osmanabad) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूकीत विविध विकास सेवा सोसायटी गटातून बळवंत तांबरे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या श्रावण सावंत यांचा पराभव केला आहे.

या निवडणुकीत महाविकास आघाडी (mva) विरुद्ध भाजप (bjp) अशी होती थेट लढत होत असून शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील व भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

एकेक निकाल हाती येत असून जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या (dcc bank election) निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

विजयी उमेदवार

बळवंत तंबारे( सेना)

बालाजी पाटील( सेना)

नागप्पा पाटील (काँग्रेस)

पराभूत उमेदवार

श्रावण सावंत (भाजप)

चंद्रकांत पाटील (भाजप)

राहुल पाटील (भाजप)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : मंगळवार शुभ ठरणार की आव्हानात्मक? आजच वाचा राशीभविष्य

Toilet Scrolling : टॉयलेटमध्ये फोन वापरताय? गंभीर आजाराचा करावा लागेल सामना, अभ्यासात मोठा खुलासा

Nangartas Waterfall : शहराच्या गजबजाटापासून दूर वसलाय नांगरतास धबधबा, पाहता क्षणी ताणतणावातून व्हाल Relax

Maharashtra Live News Update: नजर ठेवण्यासाठी पोलीसांकडून अत्याधूनिक ड्रोनचा वापर

Eye Care: डोळ्यांसाठी सर्वात महत्वाचे आहेत 'हे' व्हिटामिन, ९९% लोकांना माहिती नसेल

SCROLL FOR NEXT