Jalgaon Dhule NCP News Saam tv
महाराष्ट्र

NCP News: राज्य सरकारच्या कंत्राटी धोरणाला विरोध; राष्ट्रवादीकडून जळगाव, धुळ्यात आंदोलन

Jalgaon News : राज्य सरकारच्या कंत्राटी धोरणाला विरोध; राष्ट्रवादीकडून जळगाव, धुळ्यात आंदोलन

Rajesh Sonwane

धुळे/जळगाव : राज्य सरकारतर्फे विविध रिक्त जागांवर कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्यात यावी; असा शासन निर्णय काढला आहे. या निर्णयाविरोधात (Dhule) राज्यभरात आंदोलन केले जात आहे. त्यानुसार (NCP) राष्ट्रवादीतर्फे जळगाव व धुळ्यात आंदोलन करण्यात आले. धुळ्यात या निर्णयाची होळी करण्यात आली. (Maharashtra News)

राज्य सरकारच्या कंत्राटी धोरणाच्या जीआर विरोधामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस धुळ्यात आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने धुळ्यात राज्य सरकारने काढलेल्या या अध्यादेशाची होळी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या अध्यादेशाची होळी केली. तसेच राज्य सरकारने हा अध्यादेश तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी देखील कार्यकर्त्यांनी केली. त्याचबरोबर ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दहा वर्षांपेक्षा जास्त काळ सेवेत झाला आहे. त्यांना नियमित करून त्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सर्व नियम लागू करावेत; अशी मागणी यावेळी केली. 

जळगावात राष्ट्रवादीचे आंदोलन 
अधिकाऱ्यांची (Jalgaon) भरती आता कंत्राटी पद्धतीने  काढण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून कंत्राटी भरतीचा हा निर्णय राज्य सरकारने मागे घ्यावा; या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या युवक आघाडीच्यावतीने राज्य सरकारचा निषेध करत  राष्ट्रवादीने जळगावातील आकाशवाणी चौकात आंदोलन करण्यात आले. कंत्राटी पद्धतीने भरतीचा निर्णय राज्य शासनाने त्वरित मागे घ्यावा; अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, रिकु चौधरी आदींची उपस्थिती होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT