स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तरुणाईला देणार संधी- सुनील तटकरे  राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तरुणाईला देणार संधी- सुनील तटकरे

युवकांच्या साथीने फुंकले निवडणुकीचे रणशिंग

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युवकांना उभे राहण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून दिली जाणार आहे. खासदार सुनील तटकरे यांनी रोहा या ठिकाणी झालेल्या जिल्ह्याच्या युवक मेळाव्यात ग्वाही दिली आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक नंबरवर ठेवण्याचे आवाहन युवकांना खासदार सुनील तटकरे यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने युवकांच्या साथीने आगामी निवडणुकीचे रणशिंग या मेळाव्याच्या निमित्ताने फुंकले आहे.

हे देखील पहा-

रोहा या ठिकाणी कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्प येथील पटांगणात रायगड जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी केलेल्या भाषणात युवक हे पक्षाची ताकद असून, त्यांना राजकारणात संधी देणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे धोरण आहे. त्यामुळे विधानसभेतही पक्षाने युवकांना संधी दिली असल्याने तरुण चेहरे हे सभागृहात दिसत आहेत. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तरुणांना संधी दिली जाणार असल्याचे खासदार तटकरे यांनी भाषणातून तरुणाईला ग्वाही दिली आहे.

राज्यात आघाडी सरकार असून, नेते जो निर्णय घेतील त्याचे पालन पक्ष करणार आहे. रायगडात निवडणुकीत तरुणाईच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक नंबरवर ठेवण्याचे आवाहनही तटकरे यांनी युवक कार्यकर्ता मेळाव्यात युवकांना केले आहे. पालकमंत्री अदिती तटकरे, पारनेरचे आमदार निलेश लंके, मावळचे आमदार सुनील शेळके, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, कार्याध्यक्ष मधुकर ठाकूर यासह युवक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या युवक मेळाव्याने पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सौरभ दास, आशुतोष रांका यांना जामीन मंजूर

Winter Skin Care: हिवाळा सुरू होण्याआधी स्किन केअरमध्ये करा हे ७ बदल; त्वचा होईल मुलायम आणि चमकदार!

Satara District Bank Election: महायुतीचा जागावाटपाच फॉर्म्युला ठरला, अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी मोठी घडामोड

Diwali Horoscope : दिवाळीत 'या' ३ राशींची चांदीच चांदी! पैसा, प्रगती अन् धनलाभाचे संकेत

Dhasal Movie: 'प्रहार'नंतर ललित प्रभाकरचा नवा अंदाज; 'ढसाळ'चा दमदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT