नांदेड : वयाच्या चौदाव्या वर्षी उडवलं विमान! SaamTv News
महाराष्ट्र

नांदेड : वयाच्या चौदाव्या वर्षी उडवलं विमान !

नांदेडच्या तीन विद्यार्थ्यांना को पायलट बनन्याची संधी

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : वयाच्या चौदाव्या वर्षी विमान चालवण्याची संधी मिळणं एखादं स्वप्नचं म्हणावं लागेल. मात्र, नांदेडच्या एनसीसीच्या (NCC) नववीत शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षाच्या तीन विद्यार्थ्यांना पुण्याच्या एनडीआरएफ (NDRF) प्रशिक्षण केंद्रात को-पायलट बनून विमान (Aeroplane) चालवण्याची संधी मिळाली. यात एका विद्यार्थींनीचा समावेश आहे. (Opportunity for three Nanded students to become co-pilots)

हे देखील पहा :

देशाचे संरक्षण आणि देशसेवा करण्याची प्रेरणा बाल वयातच मिळावी यासाठी शाळे एनसीसीच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं जात. यातूनच नांदेड (Nanded) शहरातील महात्मा फुले हायस्कूलच्या शुभांगी डोनगावकर, कृष्णा देशमुख आणि ओंकार सोळंके या एनसीसीच्या तीन विद्यार्थ्यांची कॅम्प साठी निवड झाली होती. तीनही विद्यार्थांना को-पायलट बनून एअर क्राफ्ट (विमान) उडविण्याची संधी मिळाली. मिळालेल्या या प्रशिक्षणामुळे प्रेरणा मिळाल्याने या विद्यार्थ्यांनी एअरफोर्स मध्ये भरती होण्याची इच्छा व्यक्त केलीय.

को-पायलट (Co-Pilot) म्हणून विमान चालवायची संधी मिळालेल्या, महात्मा फुले हायस्कूल मधील तीन विद्यार्थ्यांपैकी कृष्णा देशमुख आणि शुभांगी डोनगावकर या दोन मुलांचे पालक शेतकरी आहेत. तर, ओंकार सोळंके हा शिक्षकाचा मुलगा आहे. या वयात विमान जवळून पहायचे स्वप्न पाहणाऱ्या मुलांना चक्क को-पायलट बनन्याची संधी एनसीसी मुळे मिळाली. विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेत आयुष्यात उंच भरारी घ्यावी असं आवाहन प्रशिक्षक आणि मुख्याध्यापकांनी केलंय.

अवघ्या चौदाव्या वर्षी एअर क्राफ्ट (विमान) को - पायलट बनण्याची संधी नांदेडच्या तीन विद्यार्थ्यांना मिळाली. आता या विद्यार्थ्यांना (Students) उत्तुंग भरारी घेण्याची मिळालेली ही प्रेरणा नक्कीच आयुष्याचं चिज करणारी आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT