Uddhav Thackeray news saam tv
महाराष्ट्र

Operation Tiger: उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, ७ वा खासदार फुटणार; शिंदेंच्या बड्या नेत्याचा दावा

Another Blow to Uddhav Thackeray: एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत. ठाकरेंचा सातवा खासदार फुटणार असल्याचा दावा शिंदेंच्या बड्या नेत्याने केला आहे.

Priya More
  • ऑपरेशन टायगरमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

  • ठाकरेंचे ६ खासदार शिंदे गटात प्रवेश करणार

  • या पक्षप्रवेशापूर्वी रामदास कदम यांनी मोठा दावा केला

  • ठाकरेंचा सातवा खासदार फुटणार असल्याचा दावा त्यांनी केला

शिंदेंच्या ऑपरेशन टायगरला यश आले. ऑपरेशन टायगरमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाकरेंचे ६ विश्वासू आमदार थोड्याच वेळात शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत. हे सर्व सहाही खासदार मुंबईतील नंदनवन या एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्याठिकाणी त्यांची बैठक होणार असून ते शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या खासदारांच्या पक्षप्रवेशापूर्वी शिंदेंचे नेते रामदास कदम यांनी मोठा दावा केला. ठाकरेंचा सातवा खासदारही फुटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रामदास कदम यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. रामदास कदम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ६ नाही तर ७ खासदारांनी स्वाक्षरी केल्या आहेत. ठाकरेंचा सातवा खासदार देखील फुटणार असून हा खासदार सध्या काठावर आहे. रामदास कदम यांच्या या दाव्यामुळे आता हा सातवा खासदार नेमका कोण अशी चर्चा सुरू झाली आहे. या माध्यमातून शिंदे पुन्हा एकदा ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.

रामदास कदम यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. त्यांनी सांगितले की, 'उद्धवजींना मी एक गोष्ट विचारतो. राज ठाकरेंचे तुम्ही जेव्हा ६ नगरसेवक फोडले होते तेव्हा संजय राऊत यांनी तुडवण्याची भाषा केली नव्हती. तेव्हा कोणी ५० खोके एकदम ओके बोलले नव्हते. जेव्हा शिंदेसाहेबांकडे विकासासाठी खासदार येत आहेत तेव्हा तुम्ही तुडवण्याची भाषा आणि खोक्यांची भाषा करत आहात. हे सर्व ६ खासदार स्वत:च्या मतदारसंघाच्या विकासासाठी आले आहेत.'

रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, 'उद्धव ठाकरेंनी स्वत:आत्मपरिक्षण केले पाहिजे की तुमची लोकं तुम्हाला सोडून का चालली आहेत? थोड्या दिवस थांबा आणखी एक ऑपरेशन होणार आहे. मुंबई महानगर पालिकेत देखील ऑपरेशन होणार आहे. उद्धव ठाकरेंना लोकं सोडून का जात आहेत. मला एकनाथ शिंदे यांचा अभिमान वाटतो.' रविवारी एकनाथ शिंदे यांनी आम्ही कोणतेही ऑपरेशन अर्धवट सोडत नाही असे म्हणाले होते.

दरम्यान, ठाकरेंचे ६ बंडखोर खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानावर दाखल झाले आहे. शिंदेंच्या उपस्थितीत या खासदारांसोबत बैठक सुरू आहे. थोड्याच वेळात हे खासदार शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत. आज सायंकाळी ४ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. यावेळी ते पत्रकार परिषदे देखील घेणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्री महोदय जरा इथेही लक्ष द्या, रस्ते-वीज गुल, स्मार्ट सिटीच्या निव्वळ बाता

Navi Mumbai Crime: नेरूळ स्टेशनभोवती गुंडाराज; थेट पोलिसांवरच उचलला हात

Veg Pulao Recipe: घरच्या घरी बनवा हॉटेलस्टाईल टेस्टी खमंग व्हेज पुलाव, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: यवत मध्ये सुप्रिया सुळे यांनी थापल्या वारकऱ्यांसाठी भाकऱ्या

होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा बंद, इराण-अमेरिका संघर्ष पुन्हा भडकला

SCROLL FOR NEXT