Uddhav Thackeray vs Eknath shinde saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटली! ६ खासदारांचा जय महाराष्ट्र, थेट धुडकावला व्हिप; दिल्लीतून सर्वात मोठी अपडेट

Uddhav Thackeray latest news : ठाकरे गटाच्या दिल्लीतील महत्त्वाच्या बैठकीला ६ खासदार गैरहजर राहिल्याने शिवसेना (उबाठा)मध्ये पुन्हा एकदा फुटीच्या चर्चांना उधाण आले आहे.

Namdeo Kumbhar

उद्धव ठाकरे यांचा पक्ष दुसऱ्यांदा फुटल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. खासदारांच्या फुटीवर पक्षाकडून व्हीप जारी करून दिल्लीत बैठक बोलवण्यात आली होती. पण या बैठकीला त्या सहा फुटीर खासदारांनी दांडी मारली. २०२२ च्या बंडखोरीनंतर ठाकरे गटाला पुन्हा एकदा लोकसभा खासदारांच्या पातळीवर मोठा राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात आहे. या ६ फुटीर खासदारांना आता कायदेशीर नोटीस पाठवली जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

उद्धव ठाकरेंच्या सल्ल्यानंतर दिल्लीमध्ये बोलावलेल्या महत्त्वाच्या संसदीय बैठकीला लोकसभेच्या ९ खासदारांपैकी केवळ ३ खासदार उपस्थित राहिले, तर ६ खासदार गैरहजर राहिले. लोकसभेचे खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, आणि राजाभाऊ वाजे हे तीन खासदार आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत हेच केवळ बैठकीत दाखल झाले होते.

ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव, संजय देशमुख आणि नागेश पाटील आष्टीकर हे ६ खासदार बैठकीला पोहोचले नाहीत आणि त्यांच्याशी संपर्कही होऊ शकलेला नाही. हे ६ खासदारांनी व्हिप धुडकावल्याचे बोलले जात आहे. या खासदारांवर हक्कभंगाची कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

खासदारकी रद्द करण्याची मागणी -

दिल्लीतील या बैठकीसाठी सर्व खासदारांना व्हिप जारी करून उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले होते. व्हिपचा निरोप ईमेल, व्हॉट्सॲप आणि फोनद्वारे प्रत्येकापर्यंत पोहोचवला गेला होता. व्हिप जारी करूनही गैरहजर राहिल्यामुळे या खासदारांवर पक्षशिस्त भंगाची कारवाई होऊ शकते. तसेच शेड्युल १० (१० वे वेळापत्रक - पक्षांतर बंदी कायदा) नुसार त्यांची खासदारकी रद्द करण्याची कायदेशीर मागणी केली जाऊ शकते.

'ऑपरेशन टायगर' यशस्वी?

शिंदे गटाकडून 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत ठाकरे गटाचे खासदार फोडल्याची चर्चा आहे. जर हे ६ खासदार एकत्र असतील, तर नऊपैकी दोन तृतीयांश (२/३) बहुमताचा आकडा त्यांच्याकडे होतो. अशा स्थितीत त्यांच्यावर शेड्युल १० नुसार कारवाई टाळता येऊ शकते आणि ते स्वतंत्र गट स्थापन करू शकतात. कालपर्यंत ठाकरे गटाला विश्वास होता की काही खासदार परत येतील. तसेच, जर खासदारांनी शिंदे गटासोबत जाण्यासाठी सह्या केल्या असतील, तर ते पत्र किंवा कागदपत्रे अद्याप मीडियासमोर का आणली नाहीत, असा सवाल ठाकरे गटाकडून उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जे फितूर झाले ते गद्दार - संजय राऊत

डायबिटीज होईल बरा! रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी तुरडाळीचे करा सेवन

Mumbai : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट! दोन संशयितांच्या पॉलीग्राफ चाचणीला न्यायालयाची मंजुरी

Health Care: तूप लावलेली चपाती खल्ल्याने वजन कमी होते की वाढते?

Shubman Gill: गौतम गंभीरचा मास्टरप्लान! गिल-किशन जोडीनं २०२७ वर्ल्डकपचं टेन्शन मिटवलं? पाहा टीम इंडियाची नवी रणनीती

SCROLL FOR NEXT