Speculation intensifies in Nashik as Operation Tiger 4.0 buzz grows over possible defection of UBT corporators amid ₹5 crore offer claims. saam tv
महाराष्ट्र

ऑपरेशन टायगर 4.0 लवकर होणार? नाशिकमध्ये ठाकरेंचे 12 नगरसेवक फुटणार?

Operation Tiger 4.0 Buzz Grows as 12 Nashik Corporators in Contact: खासदार आणि आमदारांच्या फुटीनंतर ठाकरेसेनेला पुन्हा एकदा धक्का बसणार असल्याची चर्चा सुरु झालीय... शिंदेसेनेनं आता ऑपरेशन टायगर 4.0 ची तयारी सुरु केलीय... मात्र हे ऑपरेशन टायगर नेमकं कुठे होणार? ठाकरेसेनेत पुन्हा फुट प़डणार का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

मुंबई-ठाण्यानंतर आता नाशिकच्या राजकीय वर्तुळातून मोठा भूकंप होणार असल्याची चर्चा सुरु झालीय...नाशिक महापालिकेत ऑपरेशन टायगर 4.0 ची पटकथा रचली जातेय...कारण ठाकरेसेनेच्या 15 पैकी तब्बल 12 नगरसेवक शिंदेसेनेच्या संपर्कात असल्याचा चर्चा आहे. अशातच नगरसेवकांना 5 कोटींचं अमिष दिलं जात असल्याचा आणि फोडाफोडीसाठी एजंट नेमल्याचा आरोप ठाकरेसेनेनं केलाय...मात्र ऑफर कुणी दिली? असा घोडेबाजार आमच्याकडे चालत नाही, असं प्रत्युत्तर शिंदेसेनेनं ठाकरेसेनेला दिलयं..

नाशिकमध्ये ठाकरेसेना फुटणार?

1. केशव पोरजे, गटनेता

2.प्रथमेश गिते, नगरसेवक

3. सिमा पवार, नगरसेवक

4. मंगला आढाव, नगरसेवक

5.शैलेंद्र ढगे, नगरसेवक

6. रुचिरा साळवे, नगरसेवक

7. योगेश भोर, नगरसेवक

8. भारती ताजनपुरे, नगरसेवक

9. वैशाली दाणी, नगरसेवक

10.योगेश गाडेकर, नगरसेवक

11.संजीवनी हांडोरे, नगरसेवक

12. मुरलीधर भामरे, नगरसेवक

13. माधुरी डेमसे, नगरसेवक

14 वैशाली दळवी, नगरसेवक

15. प्रमिला मैद, नगरसेवक

हे ठाकरेसेनेचे 15 नगरसेवक असून यातील 12 नगरसेवक शिंदेसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे...नाशिकच नव्हे तर राज्यातील सर्वच महापालिकेत ऑपरेशन टायगर होणार असल्याचे संकेत खुद्द मंत्री उदय सामंतांनी दिलेत... मात्र नगरसेवक गळाला लागल्यावर बघू असं प्रत्युत्तर राऊतांनी दिलंय.

दुसरीकडे नाशिकमधील ही संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी ठाकरेसेनेचे वरिष्ठ नेते मैदानात उतरणार आहेत. 11 जुलैला संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत, तर येत्या दोन दिवसांत खासदार संजय राऊत देखील नाशिकला जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. तसचं ठाकरेसेनेचे नगरसेवक लवकरच मुंबईत पक्षप्रमुखांची भेट घेणार असल्याचं समजतंय. मात्र 5 कोटींच्या विशेष निधीची ऑफर आणि ऑपरेशन टायगरची चर्चा यामुळे नाशिक महापालिकेत ऑपरेशन टायगर 4.0 होणार का? याची उत्सुकता लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लग्नाचा हट्ट धरला, वाद टोकाला गेला; सनकी बॉयफ्रेंडनं अल्पवयीन गर्लफ्रेंडला निर्घृणपणे संपवलं, मुंबई हादरली

मुंबईत भीषण अपघात, बेस्ट बसने १४ वाहनांना धडाधड उडवले; थरार CCTV मध्ये कैद

Maharashtra News Live Update: मालेगावजवळ कॅटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात,एक ठार

बेड उघडला तर नोटा आणि भिंत तोडली तर सोन्याचा खजिना! माजी ARTO अधिकाऱ्यांच्या घरात कुबेराचा खजिना

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस जास्त गळतात? 'हे' गैरसमज टाळा; तज्ज्ञांनी सांगितल्या केसांची योग्य काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT