Bhumipujan राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

उसर येथील वैद्यकीय महाविद्यालयचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन भूमीपूजन

शरद पवार अध्यक्षस्थानी तर महसूलमंत्री, आरोग्य मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री राहणार उपस्थित

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड - अलिबाग उसर येथे होत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा भूमिपूजन कार्यक्रम सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शुभहस्ते आज पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन उपस्थित राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. उसर येथे 52 एकर शासकीय जागा वैद्यकीय महाविद्यालयांसाठी प्रस्तावित करण्यात आली आहे. यासाठी राज्य शासनाने 406 कोटी निधी मंजूर केला आहे. या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे जिल्ह्यातील नागरिकांना जिल्ह्यातच उत्तम आरोग्य सेवा मिळणार आहे.

हे देखील पहा -

आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत भूमिपूजन सोहळा होणार आहे. शरद पवार हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. उपमुख्य मंत्री अजित पवार हे सुद्धा ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे, ना. विजय वडेट्टीवार, वैद्यकीय मंत्री अमित देशमुख, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र वद्रावकर, पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, सर्व आमदार यावेळी उपस्थित राहणार आहेत.

अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालय हे आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणून करण्यात आलेले आहे. पहिली 100 विद्यार्थ्यांची बॅच ही मंजूर झाली असून ऍडमिशन प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. लवकरच उसर येथील शासकीय वैद्यकीय म्हविद्यालयाच्या इमारतीचे काम सुरू होणार आहे. पालकमंत्री अदिती तटकरे यांनी भूमिपूजन कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी विशेष मेहनत घेतली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : पैशाच्या समस्या सुटतील, 5 राशींच्या व्यक्तींना भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

SCROLL FOR NEXT