onion News Saam tv
महाराष्ट्र

अजब अटींमुळे नाफेडची कांदा खरेदी रखडणार? राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात

onion farmer : अस्मानी आणि सुलतानी संकटांनी पिचलेला कांदा उत्पादक शेतकरी आता सरकारच्या जाचक अटींच्या विळख्यात सापडलाय. नाफेडनं कांदा खरेदीसाठी शेतकऱ्यांना कोणत्या अजब अटी घातल्या आहेत? आणि शेतकरी कसा अडचणीत आलाय? पाहा या विशेष रिपोर्टमधून..

Saam Tv

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमागच्या संकटांची मालिका संपायला तयार नाही. आधीच कांद्याचे दर आणि खरेदीवरून आंदोलन होत असताना आता सरकारच्या लहरी धोरणामुळे शेतकऱ्यांसमोर आणखी एक नवं संकट उभं राहिलंय. केंद्र सरकारच्या 'नाफेड' आणि 'वखार महामंडळ' या दोन्ही संस्थांमध्ये ताळमेळ नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. इतकंच नव्हे तर नाफेडनं खरेदी केलेला निम्मा कांदा वखार महामंडळानं नाकारल्यानं नवा पेच निर्माण झालाय. त्यामुळे नाफेडनं आता कांदा खरेदीचे निकष बदलण्यासाठी थेट केंद्र सरकारलाच पत्र लिहिलयं. कांदा खरेदीच्या नेमक्या अजब अटी कोणत्या आहेत ते पाहूयात...

नाफेडच्या कांदा खरेदी करण्यासाठीच्या निकषांनुसार, कांदा '55 एमएम' आकाराचा आणि कांद्याचे टरफल निघालेले नसावे. तसंच, व्यवस्थित असलेला एकसमान कांद्याची खरेदी करण्याचे नाफेडनं ठरवलंय. इतकंच नव्हे तर 'नाफेड' महाराष्ट्रातून 95 हजार टन कांदा खरेदी करणार आहे.

कांदा खरेदीला कवडीमोल भाव मिळत असल्यानं राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी थेट रस्त्यावरची लढाई लढतोय. अशातच आता वखार महामंडळाच्या अटींवर शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.

सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी लावलेल्या अटींवर आणि करारावर विऱोधकांनी जोरदार हल्लाबोल केलाय. सरकारचा हा करार शेतकऱ्यांना बुडवणारा आहे, असा आरोपही विरोधकांनी केलाय...

सरकारच्या अजब अटींमुळे नाफेडनं थेट बाजार समितीच्या लिलावातून कांदा खरेदी करावा, अशी मागणी पुन्हा जोर धरु लागलीये. विशेष म्हणजे, नाफेडच्या खरेदीनंतर कांद्याचे दर वाढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, सरकारी यंत्रणांच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकऱ्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशीच झालीये. त्यामुळे अडचणीत आलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्पष्ट धोरण आखण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : राष्ट्रवादीच्या नेत्याचं नगराध्यक्षपद जाणार, नेमकं काय कारण?

लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये टाका हे 3 पदार्थ; मुंग्या आणि झुरळे मिनिटांत होतील गायब

मुंबई लोकलमध्ये थरारनाट्य! दरवाजा बंद करण्यावरून चाकूने वार, संपूर्ण डब्ब्यात रक्तच रक्त; अंगावर काटा आणणारा Video

Open manhole accident: महापौरांच्या समोरच BMC कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला, धक्कादायक Video समोर

Maharashtra News Live Update: जालन्यात ठाकरेंची शिवसेना आक्रमक, फुटलेल्या सहा खासदारांविरोधात भीक मांगो आंदोलन

SCROLL FOR NEXT