amboli ghat, accident , sindhudurg saam tv
महाराष्ट्र

Amboli Ghat : आंबोली घाटात ट्रकची चाकं निखळली; एकेरी वाहतुक सुरु

सध्या केवळ छाेट्या वाहनांची वाहतुक सुरु आहे.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : आंबोली घाटातील (amboli ghat) वाहतुक आज (शुक्रवार) सकाळपासून एकेरी मार्गाने सुरु आहे. या घाटात एक अपघात (accident) झाल्याची माहिती मिळताच पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. पाेलिसांनी (police) दुचाकी तसेच छाेट्या वाहनांसाठी वाहतुक सुरु ठेवली असून सध्या या घाटात अवजड वाहनं एका बाजूला जागेवर उभी करण्यात आली आहेत. (amboli ghat news)

आंबोली घाटात (amboli ghat) चाळीस फूट मोरी परिसरात एका ट्रकची मागील दोन चाके सुटून अपघात (accident) घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र ट्रक रस्त्यातच अडकून पडल्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाली आहे. ही घटना आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

यावेळी वाहतूक पोलिसांकडून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी दुचाकी व लहान चार चाकी गाड्यांना एका बाजूने सोडण्यात येत आहे. मात्र दोन्ही बाजूने एसटी बस व इतर मोठी वाहने अडकून पडली आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure : हाय बीपीचा त्रास आहे? मग 'या' 7 पदार्थांपासून राहा दूर,ह्रदय राहील निरोगी

Tuesday Horoscope : आर्थिक लाभ होणार; ५ राशींच्या व्यक्तींना मिळणार नव्या संधी, वाचा आजचे राशीभविष्य

Blood Pressure : BP नियंत्रणात ठेवायचा आहे? मग पाणी पिण्याच्या या 7 गोष्टी अजिबात दुर्लक्षित करू नका

Mumbai AC Local Train: लोकलचं AC बंद, प्रवासी गुदमरले; आता लोकलच्या आतही मृत्यूची भीती?

Amir Khan Marriage: आमिर खान लव जिहादचा ब्रँड अम्बेसेडर; तिसऱ्या लग्नावरून वाद उफाळला

SCROLL FOR NEXT