जमिनीचा वाद; भावाच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून केला घात ! संदीप नागरे
महाराष्ट्र

जमिनीचा वाद; भावाच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून केला घात !

शेतीच्या वादातून तिघा जणांनी त्यांच्याच सक्ख्या-चुलत भावाची कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना हिंगोलीच्या खांबाळा गावात घडली आहे.

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

हिंगोली : राज्यात शेतजमिनीच्या वादात अनेकांचा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत, अश्या घटना टाळण्यासाठी पोलीस, महसूल प्रशासनासह शासनाच्या अनेक यंत्रणा नेहमी प्रयत्नशील असतात. मात्र, अद्याप शेतीच्या वादातून जिवे मारण्याच्या घटना थांबलेल्या नाहीत. हिंगोली मध्ये शुक्रवारी मध्यरात्री तिघांनी आपल्याच २३ वर्षीय चुलत भावाला, शेतीच्या वादातून ठार केल्याची धक्कादायक घटना वसमत तालुक्यातील खांबाळा गावात घडली आहे.

हे देखील पहा -

या घटनेतील मयत युवकाचे नाव शेषराव होडगिर असे असून तो २३ वर्षाचा आहे. शेषराव नेहमी प्रमाणे शुक्रवारी संध्याकाळी आपल्या शेताकडे जात असताना, त्याच्याच चुलत भावांनी, त्याला अश्लील भाषेत शिवीगाळ करत, मारहाण करण्यास सुरुवात केली.

शेषराव ने त्यांना प्रतिकार केला. मात्र, तिघांनी मिळून त्याच्या डोक्यात कुऱ्हाडी ने घाव घालत त्याला जखमी केले. या घटनेची माहिती मिळताच गावकरी व कुटुंबांनी पोलिसांच्या मदतीने जखमी शेषराव याला नांदेड येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने शेषराव याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जिम की योगा; वजन कमी करण्यासाठी काय आहे बेस्ट?

Ration Card New Rule: अंत्योदय अन्न योजनेत मोठा बदल; आता रेशनकार्डवर नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मिळेल ७ किलो धान्य

Kalyan : बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेप्रकरणी विधानसभेतील माहिती दिशाभूल करणारी; महाथेरो गौतम रत्न यांचा आरोप

Badlapur Crime: बदलापूर हादरले! अनैतिक संबंधावरून कडाक्याचं भांडण, नवऱ्याकडून बायकोची नाक-तोंड दाबून हत्या

मालदिवपेक्षाही सुंदर! भारतातील 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT