परळीत गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एकास अटक

 

विनोद जिरे 

महाराष्ट्र

परळीत गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एकास अटक..!

त्याच्याकडून गावठी पिस्तुलासह, 2 जीवंत काडतुसे व मॅगझीनसह जुने वापरलेले काडतुस देखील जप्त करण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनोद जिरे

बीड - बीडच्या परळीमध्ये गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एकास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तुलासह, 2 जीवंत काडतुसे व मॅगझीनसह जुने वापरलेले काडतुस देखील जप्त करण्यात आले आहे. One arrested for carrying pistol in Parli

अशोक मधुकर मुंडे (वय 34) रा.पांगरी ता. परळी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याविषयी पोलिसांनी सांगितलं की, काल एका खबऱ्या मार्फत माहिती मिळाली, दुपारी तीन वाजेच्या दरम्यान परळी शहरातील नाथ टॉकिज समोर, एक ईसम थांबला असून त्याच्याकडे गावठी पिस्तूल आहे.

अशी खात्रीलाईक माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर, सांगितलेल्या वर्णणावरुन त्या इसमास ताब्यात घेवुन त्याची चौकशी केली असता, त्याने अशोक मधुकर मुंडे असे नाव सांगीतले. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला आतुन ठेवलेला एक गावठी पिस्तूल, मॅगझीन व 2 जिवंत काडतुस मिळुन आले.

दरम्यान विनापरवाना गावठी पिस्तूल वापरल्या प्रकरणी, आरोपी अशोक मुंडे याच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात, कलम 3/25 भारतीय हत्यार कायदयाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई परळी शहर पोलिसांच्या डी.बी पथकाने केलीय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT