परतीच्या प्रवासात गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचा फटका राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

परतीच्या प्रवासात गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचा फटका

मुंबई-गोवा महामार्गवर माणगावमध्ये वाहतूक कोंडी झाली असून चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रायगड: मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे वाहतूक कोंडी झाली आहे. कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर प्रवाशांच्या चार किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे परतीच्या प्रवासात चाकरमानी गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. माणगाव पोलीस आणि वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. (On the way back, Ganesh devotees were hit by a traffic jam)

हे देखील पहा -

गौरी गणपतीचे 14 सप्टेंबर रोजी विसर्जन झाल्यानंतर आज 15 सप्टेंबर रोजी कोकणातील चाकरमानी हे पुन्हा परतीच्या प्रवासाला लागले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमानी गणेशभक्तांच्या वाहनाची संख्या वाढली असल्याने माणगाव येथे वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर चार किलोमीटर पर्यत लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

त्यामुळे परतीच्या प्रवासातही चाकरमान्यांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले आहे. वाहतूकही धीम्या गतीने सुरू असली तरी दोन ते तीन तास प्रवाशांना कोंडीतून निघण्यास वेळ लागत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rules flouted by police: नियम धाब्यावर? एकाच बाईकवरून तीन पोलिसांचा प्रवास; Video Viral होताच लोक संतापले

Ambernath Politics: अंबरनाथच्या राजकारणाची अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा, भाजपची खेळी त्यांच्यावरच उलटली, शिंदेंनी डाव टाकला, काय घडलं?

Ind vs NZ playing 11 : न्यूझीलंडविरुद्ध कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन? रोहित शर्मा, विराट कोहली खेळणार का? कोण बसेल बाकावर?

Maharashtra Live News Update: विक्रोळीत शॉपिंग सेंटरला जवळच्या मीटर बॉक्सला लागली भीषण आग

निवडणुकीनंतर भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह,राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT