Accident , Aurangabad , Boy, School , Bus Saam Tv
महाराष्ट्र

Accident News : खिडकीबाहेर डोकं काढलं, बस रिव्हर्स घेताना खांबावर आपटलं; विद्यार्थ्यानं गमावला जीव

विद्यार्थ्याच्या मृत्यूनं कुटुंबीयांसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

साम न्यूज नेटवर्क

Aurangabad : औरंगाबाद (Aurangabad) शहरात बसमधून डोके बाहेर काढल्याने जखमी झालेल्या मुलाचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या दुर्देवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचं नाव ओंकारेश्वर पंडित आहे अशी माहिती घाटी रुग्णालयातून (hospital) मिळाली. (Maharashtra News)

औरंगपुरा ते साजापूर या मार्गावर धावणा-या औरंगाबाद महानगरपालिकेची सिटी बसमधून ओंकारेश्वर प्रवास करीत हाेता. ताे बसच्या मागील सीटावर बसला होता. ड्रायव्हर बस मागे घेत असताना ओंकारेश्वरने खिडकीतून डाेकं बाहेर काढलं. त्यामुळे एका मोठ्या खांबाला त्याचे डोकं आपटलं. त्याच्या डोक्याला जबर लागला. तो गंभीर जखमी झाला.

बस चालकाला अपघात झाल्याचे लक्षात येताच त्याने बस थांबवली. त्यानंतर मुलाला रिक्षात टाकून घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचारावेळी ओंकारेश्वरचा मृत्यू झाला. ताे येथील एसबी शाळेत इयत्ता नववीत हाेता. त्याच्या मृत्यूनं मित्र परिवारास माेठा धक्का बसला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT