Old Monk is not rum FSSAI Bombay High Court claim 
महाराष्ट्र

"ओल्ड मॉन्क ही 'रम' नाहीच!" FSSAI चा बॉम्बे हायकोर्टात मोठा दावा; मद्यप्रेमींना आश्चर्याचा धक्का

FSSAI Old Monk : ओल्ड मॉन्क रम नाही असा दावा FSSAI ने बॉम्बे हायकोर्टात केला आहे. न्यूट्रल स्पिरिट आणि अतिरिक्त फ्लेव्हर्समुळे वर्गीकरणावर प्रश्न; ११ सप्टेंबरला पुढील सुनावणी.

Namdeo Kumbhar

Old Monk is not rum FSSAI Bombay High Court claim : मद्यप्रेमींमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या 'ओल्ड मॉन्क'बाबत एक अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. "ओल्ड मॉन्क ही रम (Rum) नाही असा दावा भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) बॉम्बे उच्च न्यायालयात केला आहे. ओल्ड मॉन्कचा वाद केवळ लेबलपुरता नाही, तर दारूच्या रचनेचा असल्याचे म्हणत FSSAI ने हायकोर्टात वेळ मागितला. आता पुढील सुनावणी ११ सप्टेंबरला होणार आहे.

ओल्ड मॉन्क ही रम नाही आणि ती रम म्हणून विकणे किंवा तिचा प्रचार करणे पूर्णपणे चुकीचे आहे, अशी माहिती FSSAI ने कोर्टात दिली आहे. FSSAI च्या या दाव्यामुळे मद्यप्रेमींमध्ये आणि उत्पादन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. FSSAI ने कोर्टात म्हटले की, ओल्ड मॉन्कचे वर्गीकरण 'रम-फ्लेवर्ड स्पिरिट' म्हणून केले जाऊ शकते.

ओल्ड मॉन्क या उत्पादनामध्ये प्रामुख्याने 'न्यूट्रल स्पिरिट'चा (Neutral Spirit) वापर केला गेला आहे. त्यामुळे नियमांनुसार त्याला 'रम' या श्रेणीत मोडता येत नाही, असा युक्तिवाद FSSAI ने न्यायालयासमोर आपली बाजू मांडताना केला. ओल्ड मॉन्क या लोकप्रिय ब्रँडच्या विक्री आणि जाहिरातींबाबत FSSAI ने घेतलेल्या या कठोर भूमिकेनंतर आता हायकोर्ट काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ११ सप्टेंबर रोजी यावर बॉम्बे हायकोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे.

बॉम्बे हायकोर्टाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम आंखड यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. FSSAI ने न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, ओल्ड मॉन्कमध्ये उत्पादनादरम्यान अतिरिक्त स्वाद (Added Flavors) आणि प्रामुख्याने न्यूट्रल स्पिरिटचा वापर केला जातो. अन्न सुरक्षेच्या नियमावलीनुसार, अशा प्रकारे अतिरिक्त फ्लेव्हर्सचा वापर केलेल्या उत्पादनाला 'रम' या श्रेणीत वर्गीकृत करता येत नाही. FSSAI ने न्यायालयासमोर घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे 'ओल्ड मॉन्क' ब्रँडच्या विक्री आणि वर्गीकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

FSSAI च्या वकिलांनी कोर्टात सांगितले की, हा वाद केवळ बाटलीवरील लेबलपुरता मर्यादित नसून, थेट या उत्पादनाच्या मूळ रचनेबद्दल (Product Composition) आहे. ओल्ड मॉन्कमध्ये मुख्यत्वे 'न्यूट्रल स्पिरिट' वापरले जाते आणि त्याला केवळ रमचा फ्लेवर (Rum Flavored) देण्यात आला आहे. त्यामुळे नियमांनुसार त्याला थेट 'रम' म्हणून मान्यता देता येत नाही.

दरम्यान, FSSAI च्या आक्षेपानंतर कंपनीने आपल्या बाटलीवरील लेबल्समध्ये सुधारणा करून नवीन लेबल्स पुनरावलोकनासाठी FSSAI कडे सादर केले आहेत. पण या नवीन लेबल्सची आणि त्यांच्या दाव्यांची सखोल तपासणी करण्यासाठी एफडीए/FSSAI ने उच्च न्यायालयाकडे अतिरिक्त वेळ मागितला आहे. न्यायालयाने ही विनंती मान्य केली असून, या महत्त्वाच्या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ११ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे शु्क्रवारी होणाऱ्या सुनावणीत ओल्ड मॉन्कला दिलासा मिळणार की अडचणी वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

SCROLL FOR NEXT