Jalgaon Building Collapsed Saam tv
महाराष्ट्र

Building Collapsed : जळगावात जुनी इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली महिला अडकली, बचावकार्य सुरु

Jalgaon News : जळगावात जुनी इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली महिला अडकली, बचावकार्य सुरु

संजय महाजन

जळगाव : जळगाव शहरातील  शिवाजी नगरातील मस्जिद समोर असलेली एक जुनी इमारत अचानक (Jalgaon) कोसळली. आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास हि दुर्घटना घडली असून या (Building Collapsed) इमारतीखाली एक महिला अडकली असून तिला बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहेत. (Live Marathi News)

जळगाव शहरातील शिवाजीनगरातील अमर चौकाजवळील मस्जिद समोर असलेली एक जुनी इमारत आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास अचानक इमारत कोसळली. या इमारतीच्या खाली दोन महिला अडकल्या होत्या. दरम्यान, लागलीच बचावकार्य सुरू केल्याने राजश्री सुयोग पाठक (वय ५२) यांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तर आणखी एक महिला अडकलेली असून बचाव कार्य सुरु आहे. इमारत जीर्ण झाली असल्याने यात जास्त रहिवास नव्हता अशी माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळाली आहे.

बचाव कार्य व नागरिकांची गर्दी
इमारत कोसळताच मोठा आवाज झाला. या आवाजामुळे नागरिक धावत सुटले. यामुळे घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तत्काळ दाखल होत बचाव कार्य सुरु केले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Bread Recipe: टी-टाइम स्नॅकसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी आणि स्वादिष्ट मऊ बनाना ब्रेड, वाचा रेसिपी

Maharashtra heatwave : महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा तडाखा; ४८ वर्षीय महिलेचा मृत्यू, VIDEO

Monday Horoscope: गोड बोलून कामं पूर्ण करा, 5 राशींवर असणार शंकराची कृपा; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Gold Silver Prices : खुशखबर! सोन्याचा दर घसरला, चांदीही नरमली; संपूर्ण आठवड्यात भाव किती होता?

राज्यातील प्रशासनात मोठा उलटफेर, एकाच वेळी 30 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

SCROLL FOR NEXT