प्रातिनिधिक फोटो Saam Tv
महाराष्ट्र

Beed Viral Video: बीडमधील शाळेतील शिक्षकांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल, शाळेच्या आवारात केलं अश्लील कृत्य

Beed Crime News: बीड येथील एका शाळेतील शिक्षकांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ शाळेच्या आवारातील आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Satish Kengar

Beed Viral Video:

बीड येथील एका शाळेतील शिक्षकांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ शाळेच्या आवारातील आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शाळेचे अधिकारी आणि पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. एका अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेत शिक्षक म्हणून काम करणाऱ्या पुरुष आणि महिला शिक्षकांनी शाळेच्या आवारात घाणेरडे काम केले आणि त्याचा व्हिडिओ शूट केल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी केला आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी या प्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेच्या शिपायाने या घटनेची माहिती अधिकाऱ्यांना दिली होती. मात्र तोपर्यंत या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी 9 डिसेंबरला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या व्यक्ती आणि इतरांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. (Latest Marathi News)

मुख्य आरोपी फरार

तक्रारीच्या आधारे बीड शहर पोलिसांनी पुरुष शिक्षकाविरुद्ध कलम 292 (2) (अश्लील साहित्य), कलम 294 (अश्लीलता), भारतीय दंड संहितेचे कलम 500 (बदनामी) आणि माहिती तंत्रज्ञानाच्या अनेक तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बीड शहर पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश चाटे यांनी मंगळवारी सांगितले की, मुख्य आरोपी फरार आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, त्यांचा मोबाईल बंद होता. त्यांचे कुटुंब पुण्यात राहतात. त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यासाठी एका विशेष महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. अधिकृत माहितीनुसार, शाळेत 23 महिला आणि 36 पुरुष शिक्षक आहेत. शाळेच्या एका विश्वस्ताने पत्रकारांशी बोलताना सांगितले की, 70 वर्षे जुन्या संस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का लावणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी शाळा व्यवस्थापन पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budget 2026 Live Updates: अर्थसंकल्प सादर होण्याआधीच शेअर मार्केट धडाम! सेनसेक्स, निफ्टीमध्ये घसरण

Gold Silver Rate Today: अर्थसंकल्पाआधीच गुडन्यूज! सोनं ₹१३००० तर चांदी २७००० रुपयांनी घसरली

Maharashtra Politics: भाजपचा हा सर्वात मोठा डाव, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर बच्चू कडूंचं खळबळजनक विधान

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! १४ शहरात ४८ ब्लास्ट, १२० जणांचा मृत्यू, शेकडो गंभीर जखमी

Sangli Crime : पोटच्या मुलासमोरच वडिलांची दगडाने ठेचून हत्या; सांगलीत भररस्त्यात हत्याकांड

SCROLL FOR NEXT