Beed Viral Video Saam TV
महाराष्ट्र

पराभव जिव्हारी! उमेदवाराच्या पतीकडून विजयी उमेदवाराला अश्लील शिवीगाळ

सार्वजनिक ठिकाणी अश्लील शिवीगाळ केल्याचा, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विनोद जिरे

बीड : नुकत्याच पार पडलेल्या नगर पंचायत निवडणुकीत, कुणाचा विजय तर कुणाचा पराजय झाला. तर कुठं स्थानिक मातब्बरांवर नवखे भारी पडले. यामुळं कहीं खुशी तो गम चं चित्र निर्माण झालं आहे. मात्र बीडच्या (Beed) केजमध्ये हाच पराजय नशिबी आल्यानं, पराभूत महिला उमेदवाराच्या पतीने, भर चौकात सार्वजनिक ठिकाणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला विजयी उमेदवाराला उद्देशून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तर त्यांना मतदान करणाऱ्या वार्डातील मुस्लिम मतदारांच्या नावानेही जातीवाचक शिवीगाळ केली. विशेष म्हणजे यावेळी त्याने 18 लाख रुपये गेल्याचा उल्लेख करत एक प्रकारे दम देखील दिला आहे.

लखन हजारे असं शिवीगाळ करणाऱ्याचं नाव असून तो पराभूत महिला उमेदवाराचा पती आहे. केज नगरपंचायतच्या नुकत्याच संपन्न झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत, स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवार पल्लवी ओमप्रकाश रांजनकरांचा 356 सर्वाधिक मते घेऊन दणदणीत विजय झाला आहे. तर याच प्रभागातील जनविकास आघाडीच्या पराभूत उमेदवार विनिता हजारे यांचे पती व माजी नगराध्यक्ष छाया हजारे यांचे पुत्र लखन हजारे यांनी, आपल्या पत्नीच्या पराभवाचा राग धरून, केज शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील पानटपरीवर थांबून, स्वाभीमानीच्या विजयी उमेदवार पल्लवी रांजनकरांना उद्देशून, असभ्य व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत बघून घेण्याच्या धमक्या दिल्या आहेत. तसेच प्रभागातील मुस्लिम मतदारांना जातिवाचक शिविगाळ करून एका-एकाला बघून घेण्याच्या धमक्या देत असल्याचा व्हिडिओ बीड जिल्ह्यात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

तर या प्रकाराने मतदारांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून समाजात तीव्र संताप आहे, स्वाभीमानी पक्षाच्या विजयी उमेदवार पल्लवी रांजनकर व त्यांचे कुटुंबीय प्रचंड दहशतिखाली असुन पोलिसांनी लखन हजारे विरोधात, मुस्लिम समाजाच्या जाणीवपूर्वक धार्मिक भावना दुखावणे, महिलेस सार्वजनिक ठिकाणी अर्वाच्य, असभ्य भाषेत शिवीगाळ करून विनयभंग व धमक्या दिल्या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी. तसेच स्वाभीमानीच्या पल्लवी ओमप्रकाश रांजनकरांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण तातडीने द्यावे. अशी मागणी स्वाभीमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; कार्ला फाट्याजवळ ५ किमीपर्यंत रांग

Maharastra : सर्वसामान्यांना झटका! कपड्यांची शिलाई महागणार, किती रुपये मोजावे लागणार? वाचा

बाहेरचं खाणं विसरून जाल, घरीच 10 मिनिटांत बनवा 'क्रिस्पी कॉर्न' रेसिपी

Vilas Ghule Case: विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाची चौकशी, ४ तासांच्या चौकशीत नेमकं काय घडलं?

Ex गर्लफ्रेंडसोबत मरायचा प्लान आखला, कारमध्ये बसून बॉम्बस्फोट केला, तरुण जिवंत जळाला अन्..;

SCROLL FOR NEXT