महाराष्ट्र

Laxman Hake: लक्ष्मण हाके यांची हत्या करण्याचा कट; ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंचा आरोप

OBC vs Maratha : लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन करून शिवीगाळ केल्याचा आरोप मराठा समाजातील बांधवांनी केला होता.

Bharat Jadhav

लक्ष्मण हाके सरांची हत्या करण्याचा मोठा कट होता. त्यांना कुठेतरी ओबीसी समाजाचा आवाज दडपायचा आहे, असा आरोप लक्ष्मण हाके यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी केलाय. पुण्यातील कात्रस येथे मराठा आंदोलक आणि लक्ष्मण हाके यांच्यात वाद झाला होता. लक्ष्मण हाके यांनी सार्वजनिक ठिकाणी मद्यपाशन केल्याचा आरोप केला होता.

आम्हाला दोघांना आणि आमच्या सहकाऱ्यांना हजारो धमकीचे फोन येत आहे. या राज्यामध्ये कोणीही राजा नाही आम्ही खरं बोललो, संभाजी भोसले यांच्या कार्यकर्त्यांकडून आमच्यावर जीव घेणे हल्ले होत असतील. तर संभाजी भोसले यांच्या कार्यकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे, असं नवनाथ वाघमारे म्हणालेत.

दरम्यान, हाके सरांनी रक्त तपासण्यासाठी दिलं होतं, त्यामुळे दूध का दूध आणि पाणी का पाणी झाल्याचं वाघमारे म्हणाले. आमची जातीवादी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, अशा झुंडशाहीला लगाम घालण्यासाठी यांच्या मुस्क्या आवडल्या पाहिजे. वीस पंचवीस जणांनी पकडल्यावर माणूस बेधरतो आणि तोच व्हिडिओ दाखवून म्हणायचं तुम्ही दारू पिले आम्हाला मला धमकी दिली.

चाचणी मधून दुध का दुध आणि पाणी का पाणी समोर आल आहे.त्यांनी जर मद्यपान केल असत तर ते टेस्टला तयार झाले नसते. मनोज जरांगे यांना आंतरवाली सराटीत जाताना आम्ही जर वडीगोद्री येथे पकडलं आणि दबाव टाकून जर तुम्ही दारू पिता म्हटलं तर चालेल का? असा सवालही त्यांनी केला.

काय आहे प्रकरण

सोमवारी पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्यावर मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यात वाद झाला होता. हाके यांनी मद्यप्राशन करून मराठा आंदोलन यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला होता. लक्ष्मण हाके खुल्या मैदानात दारू पिण्यासाठी बसले होते. त्यांना जाब विचारल्यानंतर हाके यांनी शिवीगाळ केली असा आरोप मराठा आंदोलकांनी केला होता. तर हाके यांनी आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असा आरोप केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT