OBC Reservation SaamTV
महाराष्ट्र

OBC Reservation : आता राज्य सरकारला गोळा करावा लागणार इम्पिरिकल डाटा!

ज्याच्यावर ओबीसी आरक्षणाचे भवितव्य अवलंबून आहे तो इम्पिरिकल डाटा म्हणजे नक्की काय? वाचा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- संतोष शाळिग्राम

नवी दिल्ली : राज्य सरकार हे इम्पिरिकल डाटा (Empirical Data) केंद्र सरकारकडून मागत आहे. केंद्राकडे असलेला डाटा मिळाला, तर आगामी निवडणुका घेता येऊ शकतात. म्हणून या डाटाची मागणी सरकार करीत होते. पण, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राज्याचा या प्रयत्न फोल ठरविला आहे. आता हा डाटा राज्याला गोळा करावा लागेल.

हे देखील पहा :

हा डाटा गोळा करण्यास दोन महिनेही पुरेसे आहेत. फक्त सरकारची इच्छा शक्ती असावी, असे याचिकाकर्ते विकास गवळी यांचे म्हणणे आहे. इम्पिरिकल डाटा गोळा करण्याची एक पद्धत असते. ओबीसी (OBC) समाजातील घरांमधील परिस्थिती संदर्भात प्रश्नावली असते. त्यात जनगणणेप्रमाणेच माहिती गोळा केली जाते. यातून ओबीसी समाजातील कुटुंबाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रगती जोखली जाऊ शकते.

राज्य सरकार हा डाटा गोळा करण्यासाठी पैशाची कमी पडू देणार नाही, असे म्हणत असले, तरी राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना जून महिन्यात होऊनही अद्याप इम्पिरिकल डाटा गोळा करण्यासंबंधी प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे राज्य सरकार हा डाटा गोळा करण्यास चालढकल करीत असल्याची टीकाही होऊ लागली आहे. राज्य सरकार अजूनही केंद्राकडील इम्पिरिकल डाटा मागण्यात वेळ घालवत आहे. केंद्राने वारंवार हा डाटा सदोष असल्याचे म्हटले आहे‌. तरीही राज्य सरकारला हाच डाटा का हवा आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

केंद्राकडे (Central Government) डाटा मागून वेळ काढण्याची ही सरकारची भूमिका स्पष्ट होत असतानाच आज सर्वोच्च न्यायालयाने हा डाटा मागणी करणारी याचिका (Letegation) फेटाळून लावत राज्य सरकारला चपराक दिली आहे. आता इम्पिरिकल डाटा हा राज्य सरकारलाच गोळा करावा लागेल. त्याची सुरवात लवकर केली, तर हा डाटा सर्वोच्च न्यायालयातही लवकर सादर करता येणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng सामना उशिराने सुरु, पावसामुळे भारताची विजयाची संधी हुकणार?

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

SCROLL FOR NEXT