OBC Reservation Movement Laxman Hake addressing a rally amid leadership disputes with Chhagan Bhujbal Saam Tv
महाराष्ट्र

Obc Reservation: ओबीसी आंदोलनात नेतृत्वावरुन संघर्ष? चळवळीबाबत हाकेंची निर्वाणीची पोस्ट

Laxman Hake Ultimatum On Obc: मराठा आरक्षणाच्या हैदराबाद गॅझेटियरविरोधात ओबीसींनी आवळलेली वज्रमूठ सैल व्हायला सुरुवात झालीय... लक्ष्मण हाकेंनी तर चळवळच सोडून देण्याचा इशारा दिलाय.. मात्र त्यामागची कारणं काय आहेत? ओबीसी आंदोलनात खरंच नेतृत्वावरुन संघर्ष पेटलाय का?

Omkar Sonawane

राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलाय.. त्यातच बीडमध्ये आयोजित केलेल्या मेळाव्याच्या बॅनरवर हाकेंना डावलल्याने ओबीसी आंदोलनात नेतृत्वावरुनच संघर्ष पेटल्याची चर्चा रंगलीय... ओबीसींच्या नावावर राजकारण केलं नसल्याचं सांगत हाकेंनी अप्रत्यक्षरित्या भुजबळांवर निशाणा साधल्याची चर्चा रंगलीय...

खरंतर लक्ष्मण हाकेंनी निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर त्यांच्या गाडीवर हल्ल्याची घटना घडलीय.. या हल्ल्यानंतर सरकार ओबीसी असल्यानेच दुर्लक्ष करत असल्याचा आरोप हाकेंनी केलाय.. खरंतर हैदराबाद गॅझेटियर लागू केल्यानंतर लक्ष्मण हाकेंनी राज्यभर मेळावे घेत वातावरण तापवलं. तर छगन भुजबळांनीही मंत्रिमंडळात राहून सरकारची कोंडी केली.. मात्र आता लक्ष्मण हाकेंना ओबीसींना म्होरक्या असं म्हटलं जात असल्याने ओबीसी चळवळीतच अंतर्गत धुसफूस वाढलीय.. त्यातच बीडमधील मेळाव्याच्या बॅनरमधूनच हाकेंना वगळलं आणि हाकेंनी आपली खदखद बोलून दाखवली.. मात्र हाकेंनी ओबीसी चळवळ सोडण्याबाबतची भूमिका घेतल्यानंतर मंत्री छगन भुजबळांनी पावसाचं कारण देत बीडमधील मेळावा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय..

मात्र ओबीसी आंदोलनात कोणत्या मुद्द्यावर फूट पडण्याची शक्यता आहे? हाकेंनी ओबीसींसाठी आक्रमक आंदोलनं सुरु केले आहेत. त्याला मोठा प्रतिसाद मिळतोय.. त्यामुळेच मंत्री छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके यांच्यात नेतृत्वासाठी स्पर्धा सुरु झाल्याचं म्हटलं जातंय.. त्यातच समता परिषदेने बीडच्या मेळाव्याच्या बॅनरवर हाकेंना डावललंय... एवढंच नाही तर ओबीसी आरक्षणासाठी हाके रस्त्यावरची तर भुजबळ कायदेशीर लढाई लढत असल्याने रणनीतीच्या दृष्टीने मतभेद असल्याची चर्चा आहे.. तसंच समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडूनच हाकेंवर टीकेची झोड उठवण्यात आली..

याच मुद्द्यामुळे ओबीसी आंदोलनात फुटीची बिजं रोवली जात आहेत..खरं तर दैत्यनांदूरच्या मेळाव्यात चळवळीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता ..मात्र चळवळीतून बाहेर पडण्याबाबत हाकेंनी कोणतीच भूमिका जाहीर केली नाही.. त्यामुळे हाकेंनी आपली बंडाची तलवार म्यान केली आहे का? असा प्रश्न निर्माण झालाय..मात्र हाकेंनी चळवळ सोडण्याचा इशारा दिल्याने ज्येष्ठ ओबीसी नेते असलेले छगन भुजबळ हाकेंची नाराजी दूर करणार की रिपब्लिकन पक्षाप्रमाणे ओबीसी आंदोलनाचीही शकलं उडणार... यावर चळवळीची दिशा ठरणार आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tamil Nadu Stampede: विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशामुळे झाली? नेत्यांमुळे की पाण्याच्या बाटल्या वाटपामुळे? मुख्य कारण काय

Vijay Thalapathy Rally: बत्ती गूल होताच घडली चेंगराचेंगरी, ३१ जणांचा मृत्यू ; अभिनेत्याच्या सभेत धडकी भरवणारी गर्दी, Video Viral

Voter ID Scam in South Mumbai: मुंबईच्या सोसायटीमध्येही व्होटचोरी? राहणार फुटपाथवर, पत्ता सोसायटीचा

'PM केअर फंडातून कर्जमाफी द्या' शेतकरी कर्जमाफीवरुन ठाकरेंनी घेरलं

Shocking : नणंद देखण्या वहिनीच्या प्रेमात, घर सोडून दोघी पळाल्या; WhatsApp चॅट्समुळे सत्य आलं समोर

SCROLL FOR NEXT