obc mahasang morcha in chandrapur on 7 feb says sachin rajurkar saam tv
महाराष्ट्र

Rashtriya OBC Mahasangh : वादग्रस्त राजपत्र रद्द करा : मागास प्रवर्गाची मागणी

ओबीसी महासंघाचा सरकारच्या निर्णाय विराेध असल्याचे सांगण्यात आले आहे.

संजय तुमराम

Chandrapur News :

सामाजिक न्याय विभागाने अनुसूचित जाती /जमाती , इतर मागास प्रवर्ग , विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी डिसेंबर महिन्यात अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेमध्ये बरेच बदल केले आहेत. या राजपत्रामुळे प्रमाणपत्र मिळण्यात बोगसगिरी होण्याची भीती राष्ट्रीय ओबीसी महासंघचे महासचिव सचिन राजूरकर यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केली. (Maharashtra News)

महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्ग अधिनियम २००० मध्ये बदल करण्यासाठी सरकारने एक राजपत्र काढले आहे. त्याला ओबीसी महासंघाचा विराेध आहे.

हे राजपत्र रद्द करावे या मागणीसाठी 7 फेब्रुवारी 2024 ला ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचीत जमाती आदी तर्फे चंद्रपुरात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचे  नियोजन करण्यासाठी एका बैठकीचे नुकतेच आयोजन करण्यात आले हाेते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या बैठकीत राष्ट्रीय ओबीसी महासंघचे महासचिव सचिन राजूरकर यांनी हा लढा सर्व शक्तीनिशी लढण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यास सर्वांनी समंती देत राजपत्र रद्द झाल्याशिवाय थांबणे नाही असा निश्चय केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT