OBC Mahamelava: Saam Digital
महाराष्ट्र

OBC Mahamelava: आता नांदेडमध्ये ओबीसी महामेळावा; छगन भुजबळांची तोफ धडाडणार, जरांगे-पाटील यांच्या सभांना देणार उत्तर

OBC Mahamelava: मराठा ओबीसी आरक्षणावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. आरोप प्रत्यारोपांच्या आणि तणावाच्या या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ७ जानेवारीला ओबीसी मेळावा होत आहे.

Sandeep Gawade

OBC Mahamelava

मराठा ओबीसी आरक्षणावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. आरोप प्रत्यारोपांच्या आणि तणावाच्या या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ७ जानेवारीला ओबीसी मेळावा होत आहे. या मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, बिहारचे उपमुख्यमंत्री यशस्वी यादव यांच्यासह राज्यातील ओबीसी नेत्यांना आमंत्रण दिले जाणार आहे. इतर राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मेळाव्याला उपस्थित राहणार असल्यामुळे मेळाव्यात नेमकी काय भूमिका मांडणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

ओबीसी महामोर्चातर्फे 7 जानेवारी रोजी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सुरुवातीला मंत्री छगन भुजबळ नांदेडच्या सभेला उपस्थित राहणार नाहीत अशा बातम्या काही माध्यमांमध्ये प्रसारित झाल्या होत्या. मात्र छगन भुजबळ सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती ओबीसी महामोर्चाने दिली आहे. जरांगे पाटील यांच्या सभांना उत्तर देण्यासाठी आता ओबीसी समाजातर्फे मंत्री छगन भुजबळ यांच्या सभांचे आयोजन केले जात आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नांदेड जिल्ह्यातील नरसी येथे ओबीसी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून 50 एकरच्या मैदानावर नियोजन करण्यात आले आहे. या महामेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,ओबीसी नेते प्रकाशअण्णा शेंडगे, पंकजा मुंडे, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर हे उपस्थित राहणार असल्याची माहिती ओबीसी महामोर्चातर्फे देण्यात आली. या महामेळाव्यासाठी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, बिहार चे उपमुख्यमंत्री यशस्वी यादव यांनाही आमंत्रण दिले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मालेगावात अद्वय हिरे यांची पत्रकार परिषद; अब्रुनुकसान खटला मागे, संजय राऊत व दादा भुसे यांचे आभार

iPhone 16 फक्त 35,991 रुपयांमध्ये! MacBook Air M4 पेक्षाही कमी दरात, नेमकं कुठं मिळतोय?

Khushi Mukherjee: प्रसिद्धीसाठी खुशी मुखर्जीची हद्द पार; स्टाइलच्या नावाखाली काहीही घालून आली, नेटकरी म्हणाले,'लाज वाटत...'

महायुती सरकार कोसळणार? वाल्मीक कराडचं नाव घेत बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

Crime News: 'टॉपर' पोरगा बनला हैवान! अख्खं कुटुंबाला संपवलं; मांजरीचाही घेतला जीव

SCROLL FOR NEXT