Prakash Shendge: Saam tv
महाराष्ट्र

Prakash Shendge: 'सरसकट कुणबी मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला तर...; ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी सरकारला दिला मोठा इशारा

Prakash Shendge: सरकारने तसा जीआर काढला तर आम्ही कोर्टामध्ये जाऊ. तसेच 2024 ला सरकारला खाली खेचू,असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला.

विनोद जिरे

Prakash Shendge News:

'सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा कायम विरोध आहे. सरकारने तसा जीआर काढला तर आम्ही कोर्टामध्ये जाऊ. तसेच 2024 ला सरकारला खाली खेचू,असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Latest Marathi News)

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषद घेऊन आरक्षणावरील भूमिका स्पष्ट केली. 'बीडमधील आंदोलक आमचे नसल्याचे मनोज जरांगे म्हणाले. एक महिन्या नंतरही मास्टर माईंड सापडला नाही. ओबीसी समाज दहशती खाली आहे. यामागे कोणी राजकीय व्यक्ती आहे का, याचा शोध घ्यावा, अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी केली.

'सभेला जागा देणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली. मग बीडमध्ये नुकसान भरपाई का दिली नाही? आता छगन भुजबळ यांना लक्ष्य केले जात आहे. ओबीसी समाजाला भीतीतून बाहेर काढण्यासाठी मेळावा घेतला. आता यापेक्षा मोठा मेळावा हिंगोली येथे होणार आहे. तेथे बावनकुळे यांनाही बोलावले आहे. त्यांच्यासह अनेक नेते उपस्थितीत राहील, असे शेंडगे यांनी सांगितले.

'मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये ही आमची मागणी आहे. मराठा मोर्चाला आमचा पाठिंबा होता. पण त्यांचे आरक्षण कोर्टात टिकू शकले नाही. त्यामुळे त्यांना आताही आरक्षण मिळू शकत नाही. आता इड्ब्लूएस आरक्षण मराठा समाजाला आहे. तुम्ही ओबीसीमधूनच आरक्षण मागत आहात. हे चुकीचे आहे. आज बीडमध्ये पाचशे ओबीसी बांधवांनी मराठा समाजाच्या एकही नेत्याला मतदान करणार नाही अशी शपथ घेतली आहे, असे त्यांनी सांगितले.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'आमच्या लेकरा बाळाचे हक्काचे आरक्षण काढू देणार नाही. असे झाले तर आम्ही सरकार खाली खेचू. लिंगायत समाज सुद्धा या लढाईमध्ये आमच्या सोबत आहे. काय होईल ते बघू, पण ओबीसीमधून आरक्षण देऊ देणार नाही. जर निर्णय झाला तर कोर्टात दाद मागणार आहोत, असे शेंडगे यांनी स्पष्ट केले.

'पंकजा मुंडे यांना भाजपने पाठवले नाही, हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी भडकाऊ भाषण केले नाही. गावबंदीचे बॅनर काढा असे पोलिसांना म्हटले. हिंगोलीची सभा मोठी होणार आहे. खरंतर मनोज जरांगे यांच्यामुळे माळी समाजाचा फुल व्यवसाय वाढला. त्यांनी अशाच सभा घ्याव्यात, असेही ते पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Accident: लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १०० जणांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला कंटेनरची धडक; ४ जणांचा मृत्यू

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? ठाकरेंचे ६ खासदार फुटणार? हिंगोलीतील खासदार एकनाथ शिंदेंच्या भेटीला

Maharashtra News Live Update: मनिषा मांढरेंचे मॉडर्न महाविद्यालयातून निलंबन

SCROLL FOR NEXT