OBC Reservation Saam Digital
महाराष्ट्र

OBC Reservation: आरक्षणाच्या आडून नक्की काय सुरू आहे? बारा बलुतेदारांनी का नाकारलं ओबीसी बैठकीचं निमंत्रण? जाणून घ्या

OBC Reservation News: छगन भुजबळ कायम बारा बलुतेदारांच्या मागण्यांना विरोध करतात, बगल देतात त्यामुळे त्यांनी उद्या बोलावलेल्या बैठकीत वंचित ओबीसी बारा बलुतेदार सहभागी होणार नसल्याची माहिती ओबीसी बारा बलुतेदार नेते सोमनाथ काशिद यांनी दिली आहे.

Sandeep Gawade

OBC Reservation

छगन भुजबळ कायम बारा बलुतेदारांच्या मागण्यांना विरोध करतात, बगल देतात त्यामुळे त्यांनी उद्या बोलावलेल्या बैठकीत वंचित ओबीसी बारा बलुतेदार सहभागी होणार नसल्याची माहिती ओबीसी बारा बलुतेदार नेते सोमनाथ काशिद यांनी दिली आहे. छगन भुजबळ किंवा समता परिषद म्हणजे संपूर्ण ओबीसी समाज नाही. त्यांची सध्याच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय डेव्हलपमेंट सुरू आहे , याची आता संपूर्ण ओबीसींना खात्री होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

जरांगेंनी दिलेला शब्द पाळावा

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला न्याय मिळाल्यानंतर बारा बलुतेदारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा सुरू करू असा शब्द मला दिलेला आहे, त्यांनी दिलेला शब्द पाळावा, असं आवाहन त्यांनी जरांगेंना केलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ओबीसी नेत्यांची नाराजी

मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांच्या जुन्या 'कुणबी' नोंदीच्या आधारावर त्यांच्या सग्या-सोयऱ्यांना कुणबी दाखला देण्याचा निर्णय रात्री २:३० वाजता घेतला आहे. त्याचे राजपत्र घेऊन मुख्यमंत्री वाशी येथे उपोषणस्थळी रवाना झाले आहेत. असा निर्णय घेऊन सरकारने ओबीसी आरक्षणावर वरवंटा फिरवला आहे, अशी प्रतिक्रिया ओबीसी नेत्यांनी व्यक्त केली आहे.

" मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा लढा तीव्रतेने लढला. त्यांना मराठा बांधवांनी प्रचंड प्रतिसाद देखील दिला. एक प्रकारे त्यांनी ही लढाई जिंकली, परंतु तहामध्ये माञ ते हरले, असेच चित्र उभे ठाकले आहे", अशी प्रतिक्रिया माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिलीये.

"मनोज जरांगे यांच्या लढ्याला जरी यश मिळाले असेल, तरी निश्चितच मंत्री छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे आणि ओबीसीच्या लढ्याला अपयश आले आहे. सरकारने ओबीसी आरक्षणाला साधे धक्के नाही तर, भूकंपाचे धक्के दिलेत", अशी खंतही राठोड यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Holiday News: पुढील आठवड्यात सलग 4 दिवस बँका बंद; SBI, HDFC सह सर्व बँकांच्या ग्राहकांनी आधीच तपासा सुट्ट्यांची यादी

Maharashtra News Live Update: जुन्नर तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन; गुंजाळवाडी, वडगाव सहाणी आणि सावरगाव परिसराला दिलासा

रोज सकाळी प्या मनुक्याचं पाणी, हे 5 आजार दूर होतील

विकृतीचा कळस! ६० वर्षीय नराधमांचा 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; कल्याण हादरलं

Breaking: सी-फूड एक्सपोर्ट कंपनीमध्ये मोठी दुर्घटना, गॅसची गळती होऊन ७ महिला कामगारांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT