बदली धोरणा विरोधात परिचारिका आक्रमक; काळ्या फिती लावून निदर्शने... विनोद जिरे
महाराष्ट्र

बदली धोरणा विरोधात परिचारिका आक्रमक; काळ्या फिती लावून निदर्शने...

काळ्या फिती लावून निदर्शने

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनोद जिरे

बीड - अंबाजोगाईत Ambajogai शासनाच्या बदली धोरणाच्या विरोधात, परिचारिका Nurse आक्रमक झाल्या आहेत. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय Hospital वैद्यकीय महाविद्यालयासमोर, परिचारिकांनी काळ्या फिती लावून निदर्शने करुन शासनाचा निषेध केला आहे. बदलीचे अधिनियम 2005 च्या अधिन राहुन परिचारिकांच्या बदल्या करण्याचे संचालनालयाच्या विचाराधीन आहे. या बदल्या परिचारीका संवर्गासाठी अन्यायकारक असल्याचे, परिचारिकांच्या वतीने सांगण्यात येत आहे.

परिचारिकांचे पद हे सेवेचे पद असून कोणतेच आर्थिक व्यवहार या पदाच्या माध्यमातून होत नाहीत. त्यामुळे भ्रष्टाचाराचे निर्मुलन करण्यासाठी बनवलेला बदली नियम, 2005 मधून परिचारीकाना वगळण्यात यावे.

हे देखील पहा -

कोरोना महामारी अजून संपलेली नसुन तिसरी लाट, डेल्टा प्लस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या महामारीत इमान इतबारे काम करणाऱ्या परिचारिकांच्या अशा बदल्या केल्यास, या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहणाऱ्या परिचारिकांचे मानसिक खच्चीकरण होईल. याकरता शासनाने सदरील मुद्दयांचा विचार करावा.

संघटनेला विचारात घेतल्याशिवाय कोणतीही बदली करू नये. या मागण्या घेऊन आज स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयासमोर, परिचारीकानी काळ्या फिती लावून निदर्शने व निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान न्याय न मिळाल्यास संघटनेच्या वतीने उग्र आंदोलन पुकारले जाईल. असा इशारा परिचारिकांच्या वतीने देण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची पहिल्यांदाच SIT चौकशी, IPS सातपुतेंनी ६ तासांत काय-काय विचारलं?

Vasai: लग्न मंडपात तुंबळ हाणामारी, वऱ्हाडींनी एकमेकांना धूधू धुतलं; VIDEO व्हायरल

सोने खरेदी अन् विदेश यात्रा टाळा, पेट्रोल-डिझेल-गॅस जपून वापरा; PM मोदी यांचं मोठं आवाहन

Maharashtra News Live Update: चंद्रपुरात खळबळ, एकाचवेळी ३ अल्पवयीन मुलं बेपत्ता

Moong Dal Chilla Recipe: सकाळी करा नाश्ता हेल्दी, झटपट बनवा टेस्टी मूग डाळ चिल्ला, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT