Sharad Pawar On Maharashtra Water Crisis Situation:  Saam TV
महाराष्ट्र

Sharad Pawar: '७३ टक्के राज्य दुष्काळाच्या छायेत', प्रचार संपला, आता मदत करा' शरद पवार यांची राज्य सरकारकडे मागणी!

Sharad Pawar On Maharashtra Water Crisis Situation: राज्यात वाढत चाललेला दुष्काळ, पाणी टंचाईची दाहकता याबाबत माहिती देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्य सरकारकडे मोठ्या मागण्या केल्या आहेत.

Gangappa Pujari

सुनिल काळे, मुंबई, ता. २४ मे २०२४

एकीकडे अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असतानाच राज्यातील काही भागात दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत परिस्थितीची माहिती दिली. तसेच राज्य सरकारने दुष्काळ निवारणाबाबत उपाय योजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

काय म्हणाले शरद पवार?

"राज्यात पाण्याची स्थिती गंभीर आहे. १९ जिल्ह्यात परिणाम आहे. ७३ टक्के राज्य दुष्काळाच्या छायेत आहे. १५०० महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यातल्या पाणीसाठ्यात मोठी घट झाली. संभाजीनगरमध्ये १५६१ टँकरची मागणी आहे, पण पाणीपुरवठा कमी आहे," अशी सविस्तर माहिती शरद पवार यांनी यावेळी दिली.

तसेच "पीककर्जाचे पुर्व गठन, कर्जवसुलीला स्थगिती द्यावी. शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे, त्यावर विमा कंपनी टाळाटाळ करत आहे. त्यात केंद्राने हस्तक्षेप करावा. विजपुरवठा खंडित करु नये, रोजगार हमी कामाचे निकष शिथिल करावेत. शैक्षणिक शुल्क माफ करावे, चारा छावण्या सुरू कराव्या, अशा मागण्या दुष्काळग्रस्त भागातील लोकांच्या आहेत, त्या मागण्या आम्ही सरकारकडे करत आहोत," असेही शरद पवार म्हणाले.

"प्रचाराच्या काळात दुष्काळी उपाययोजना करण्यात अडचणी होत्या. निवडणूक आयोगाचे तसे निर्देश होते. मात्र आता प्रचार संपलाय, आता मदत करावी, अशी मागणीही शरद पवार यांनी यावेळी केली. तसेच पुण्यातील कार दुर्घटना हा एक अपघात आहे. त्याला इतके राजकीय महत्व आहे, असे मला वाटत नाही," असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT