Rajesh Tope Latest Marathi News, Corona forth wave latest news  Saam Tv
महाराष्ट्र

कोरोनाची चौथी लाट असल्याचे मी म्हणालो नाही, पण...; राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण

आरोग्य भरतीच्या परीक्षांबाबतही राजेश टोपेंनी महत्त्वाचे विधान केले आहे.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढीबाबत माहिती दिली आहे. कुठेही चौथी लाट असल्याचा माझा सूतोवाच नाही. सध्या छोटी संख्या वाढत आहे. महराष्ट्राने (Maharashtra Corona Update) मोठी रुग्ण संख्या पहिली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे याठिकाणी थोडी रुग्ण संख्या वाढली आहे. ज्या राज्यात रुग्ण संख्या वाढत आहे. त्याठिकाणच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक झाली त्यात रुग्ण गंभीर नाही, जरी रुग्ण संख्या वाढली तरी सौम्य लक्षणे असतील असा अनुमान काढला जात असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत. (Rajesh Tope Latest Marathi News)

'आरोग्य भरतीची परीक्षा नामांकित संस्थांकडून घेणार'

राज्यात मागच्या काळात आरोग्य भरतीमध्ये घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. आरोग्य भरती संदर्भात विधानसभेत आश्वासन दिले होते. पोलिसांना सखोल चौकशी करण्यासंदर्भत आदेश दिले होते. पोलिसांचा डिटेल अंतिम रिपोर्ट अत्यावश्यक आहे. ड वर्गाचा पेपर तो पूर्ण व्हायरल झाला होता त्यामुळे आम्ही पुन्हा 'ड' वर्गाची परीक्षा घेणार आहोत. मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा केली त्यांचं ही मत लक्षात घेतलं आहे. दोन्ही ही परीक्षा लवकर घेण्याचा निर्णय घेऊ. मंत्री मंडळाचा निर्णय आहे त्याचबरोबर नामांकित संस्थांकडून परीक्षा घेण्याचा देखील निर्णय ह्यात झाला असल्याचे राजेश टोपे म्हणाले आहेत.

''अशी पद्धत मी आरोग्य मंत्री असताना पाहिली नाही''

राजेश टोपेंनी यावेळी माध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांच्या व्हायरल होणाऱ्या फोटोवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. सिटी स्कॅन, MRI याठिकाणी जाऊन फोटो काढणं ही पध्दत मी आरोग्य मंत्री असताना कुठं पाहिली नाही. आशा पद्धतीचा फोटो सेशन रुग्णालयाला अंधारात ठेवून कुणी दुसऱ्याने केला असेल हे पण चुकीचं आहे. ह्यात आपण TRP वाढविण्यासंदर्भातील कारवाई करू नये, ह्यात राजकारण करण्याचा काम करू नये ही चुकीची पद्धत आहे असे राजेश टोपे म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात विशेष दर्शन पाससाठी डिजिटल पेमेंट सुरू करण्याची मागणी

Auto Drivers Strike : मुंबईत परप्रांतिय चालकांचा संप, ३ दिवस रिक्षा-टॅक्सी बंद; कारण ऐकून तुम्हालाही राग येईल

Pune Crime: पुण्यात गोळीबाराचा थरार! बायकोसोबत टोकाचा वाद, नवऱ्याने स्वत:वरच झाडली गोळी

Kas Pathar Flower Festival 2026: कास पठारचं खुलणारं सौंदर्य, 'फुलोत्सव' लवकरच; ऑनलाईन बुकिंग कशी कराल आणि पैसे किती ? जाणून घ्या

मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला! मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली; शिक्षण क्षेत्रात शोककळा

SCROLL FOR NEXT