Historic decision of Kolgaon Gram Sabha; Rs 500 fine for abusing mother and sister  saam tv
महाराष्ट्र

AhilyaNagar News: आई-बहिणीवरून शिवी द्याल तर बसेल दंड; कोळगावच्या निर्णयाची राज्यभरात चर्चा

Kolgaon Village Historic Decision: महिला ग्रामसभेत महिलांनी गावच्या सामाजिक शिस्तीसाठी अत्यंत धाडसी आणि कौतुकास्पद आणि ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. एकमेकांच्या वादात आई-बहिणीवरून शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीला ५०० रुपये दंड आकारण्याचा ऐतिहासिक ठराव या सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला

Bharat Jadhav

  • कोळगाव ग्रामसभेचा सामाजिक शिस्तीसाठी महत्त्वाचा निर्णय.

  • आई-बहिणीवरून शिवीगाळ करणाऱ्यांवर ५०० रुपयांचा दंड.

  • विशेष महिला ग्रामसभेत सर्वानुमते ठराव मंजूर.

सुशील थोरात, साम प्रतिनिधी

कोणाशी वाद झाला तर लागलीच अनेकांच्या तोंडातून शिव्या येतात. इतकेच काय साधं बोलताना सुद्धा अनेकजण आई-बहिणीवरून शिव्या देतात. पण आता मात्र लोकांच्या तोंडाला लगाम लावली जाणार आहे. अहिल्यानगरमधील एका गावातील नागरिकांनी याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आई किंवा बहिणीशी संबंधित अपशब्द वापरणाऱ्या व्यक्तींना दंड आकारण्याचा ठराव नगरच्या श्रीगोंदा येथील कोळगाव ग्रामपंचायतीने घेतला आहे.

गावातील सार्वजनिक ठिकाणी किंवा वैयक्तिक वादात आई-बहिणीचा उद्धार करून शिवीगाळ करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला आहे. जो कोणी शिवी देईल, त्या संबंधित व्यक्तीला ५०० रुपये दंड ठोठावण्याचा ऐतिहासिक ठराव घेण्यात आला आहे. जागतिक महिलादिनाचे औचित्य साधत कोळगाव येथे महिलांची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.

यात महिलांनी गावच्या सामाजिक शिस्तीसाठी अत्यंत धाडसी आणि कौतुकास्पद आणि ऐतिहासिक निर्णय घेतले. एकमेकांच्या वादात आई-बहिणीवरून शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीला ५०० रुपये दंड आकारण्याचा ऐतिहासिक ठराव या सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

कोळगावात विविध जाती आणि धर्मांचे सुमारे ९००० नागरिक राहतात. गावातील अनेकांचा प्रपंच हा शेतीवर अवलंबून आहे. दरम्यान रविवारी सरकारी निर्देशांनुसार ज्येष्ठ अंगणवाडी सेविका (कार्यकर्ता) शकुंतला देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष महिला ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत शेती आणि इतर क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमादरम्यान पूजा जगताप यांनी आई किंवा बहिणीबद्दल अपशब्द वापरणाऱ्या गावकऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव मांडला होता, अशी माहिती सरपंच पुरुषोत्तम लगड यांनी दिली. पूजा जगताप यांनी ग्रामसभेत मांडलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली असं सरपचं पुरुषोत्तम लगड म्हणाले. बराच विचारविनिमय केल्यानंतर शिवीगाळ करणारे आणि अपमानास्पद भाषा वापरणाऱ्यांवर ५०० रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला,” असे सरपंच लगड म्हणाले.

तसेच दंड आकरण्याच्या नियमाचा गैरवापर रोखण्यासाठी डिजिटल पुरावे सादर केले जातील. त्यानंतर दंड आकारला जाईल यावर गावकऱ्यांचे एकमत झाले. "हा प्रस्ताव महिलांकडून आला असल्याने पंचायतीने त्यांना (आणि आवश्यक असल्यास, त्यांच्या मुलांना) गुन्हेगारांची ओळख पटवण्यात पुढाकार घेण्याचे आवाहन केले," असे लगड म्हणाले. तसेच आरोपीकडून गोळा केलेला दंड गावाच्या विकासासाठी वापरला जाईल अशी माहिती सरपंच पुरुषोत्तम लगड म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT