Devendra fadnavis on lockdown Saam
महाराष्ट्र

Devendra fadnavis : लॉकडाउनची अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई; CM फडणवीसांचा कडक इशारा

Devendra fadnavis on lockdown : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीनंतर भारतात इंधन किंवा गॅस टंचाई होणार नाही, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Devendra Fadnavis statement : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून देशातील इंधन व गॅस पुरवठ्याचा आढावा घेतला असून, भारतात कोणतीही टंचाई निर्माण होणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषदेत दिली. काही जण जाणीवपूर्वक लॉकडाऊन किंवा पुरवठा खंडित होणार अशा अफवा पसरवत असून, अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या धोरणात्मक नियोजनामुळे पेट्रोल, डिझेल आणि LPG चा पुरवठा सुरळीत आहे. तसेच देशभरात PNG (पाइप नॅचरल गॅस) नेटवर्क मोठ्या प्रमाणात वाढवले जात असून, नागरिकांपर्यंत पाइप गॅस पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रांत पाइप गॅस उपलब्ध करून देण्यासाठी नुकताच शासन निर्णय (GR) काढण्यात आला आहे.

याशिवाय, राज्य सरकारने १५० दिवसांचा विशेष कार्यक्रम राबवून विविध विभागांमध्ये सुधारणा केल्या असून सुमारे ४० हजार कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. नागरिकांना आवश्यक असलेल्या सुमारे ९० टक्के सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

रायगड येथे ‘पल्स मेडिकल कॉन्क्लेव्ह’ अंतर्गत 'वर्ल्ड ड्रग हब' आणि 'आधुनिक मेडिकल पार्क' उभारण्याचे नियोजन असून, त्यासाठी काही सामंजस्य करारही करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, महानगर गॅस लिमिटेडच्या माध्यमातून शहरांमध्ये गॅस वितरणाचे काम वेगाने सुरू असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT