Maratha Aarakshan Saam TV
महाराष्ट्र

Maratha Aarakshan : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माढा तालुक्यात 'नो एन्ट्री', मराठा समाजाचा इशारा

Ajit Pawar News : येत्या 23 आक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे माढा तालुक्यात येणार आहे.

भरत नागणे

Pandharpur News :

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पु्न्हा आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली 40 दिवसांची वेळ संपण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत. त्याआधी आधीच सकल मराठा समाजाने नेत्यांना गावांमध्ये फिरकू न देण्याचा इशारा दिला आहे.

मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापू लागलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सकल मराठा समाजाने माढा तालुक्यात प्रवेश बंदीचा इशारा दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

येत्या 23 आक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे माढा तालुक्यातील राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांच्या टेंभुर्णी येथील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यावर कार्यक्रमाच्या निमित्ताने येणार आहेत. (Latest Marathi News)

अजित पवारांच्या या कार्यक्रमाला माढा तालुक्यातील सकल मराठा समाजाने विरोध केला आहे. या संदर्भात माढा पोलिसांना लेखी पत्र दिले आहे. (Political News)

पत्रात काय म्हटलं आहे?

मराठा आरक्षण द्या, मगच तुमचे दौरे करा, अशी मागणी सकल मराठा समाजाने पत्राद्वारे केली आहे. अजित पवार यांना येत्या २३ ऑक्टोबर रोजी पिंपळनेर येथील कारखान्यावरील दौऱ्याबाबत प्रवेश करण्यात येत आहे. तसे झाले नाही तर अजित पवार यांना सकल मराठा समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: सर्वाधिक ऑक्सिजन देणारे झाड कोणते आहे? जाणून घ्या

Maharashtra Live News Update : नागपुरात अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच महासत्संग आयोजन

Mumbai Tourism : पाऊस, समुद्रकिनारा अन् गरम चहा; मुंबईतील 'हे' प्रसिद्ध ठिकाण, जेथे असते दिवसरात्र गर्दी

Thackeray Brothers : ठाकरेंचं ठरलं का? दसरा मेळाव्यात युतीचं तोरण बांधणार का? शिवाजी पार्कवर राज ठाकरे विचारांचं सोनं लुटणार का?

Thursday Horoscope : जोडीदारासोबत आज काय घडणार? ही रास तुमची तर नाही? वाचा गुरुवारचे भविष्य

SCROLL FOR NEXT