Nitin Gadkari Threat Case saam tv
महाराष्ट्र

Nitin Gadkari Threat : नितीन गडकरींना धमकी देणाऱ्या जेलमधील गुंडाचा धक्कादायक खुलासा; पोलिसांना म्हणाला...

Nitin Gadkari News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणाऱ्या आरोपीने पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक खुलासे केले आहेत.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nitin Gadkari Threat Case: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना 21 मार्च रोजी जीवे मारण्याची धमकी देणारा कॉल आला होता. बेळगाव येथील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असेलेला गुंड जयेश पुजारीने गडकरींच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलजवळील कार्यालयात किमान तीन वेळा फोन करून 10 कोटी रुपयांची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण न केल्यास गडकरींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

या धमकीच्या कॉलनंतर चार दिवसांनी नागपूर पोलिसांच्या पथकाने 25 मार्च रोजी जयेश पुजारी याला बेळगाव येथील कारागृहातून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून किमान दोन मोबाईल आणि दोन सिमकार्ड जप्त करण्यात केले जे तो तुरुंगात बेकायदेशीरपणे वापरत होता.

दरम्यान या प्रकरणार पोलिसांच्या चौकशीत जयेश पुजारीने धक्कादायक खुलासे केले आहेत. डॅान व्हायचं म्हणून त्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा कॅाल केला असा खुलासा जयेश पुजारी याने केली आहे. 'डॉन' म्हणून नावारूपास येण्यासाठीच गडकरी यांना धमकी दिली असा नवा खुलासा पुजारीने केला आहे.

जयेश पुजारी ऊर्फ कांथा हा सध्या नागपूर धंतोली पोलिसांच्या ताब्यात आहे. बेळगाव कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना जयेश पुजारीने नितीन गडकरी यांच्या कार्यालयात खंडणीसाठी कॉल केले होते. सध्या ‘प्रोडक्शन वॉरन्ट’वर जयेश पुजारी नागपुरात आणण्यात आले आहे. (Latest Marathi News)

यापूर्वी 14 जानेवारी रोजी देखील पुजारीने गडकरींच्या कार्यालयाला कॉल करून 100 कोटी रुपये देण्याची मागणी केली होती. त्यानंतर 21 मार्च रोजी त्याने पुन्हा कॉल करून 10 कोटी रुपये मागितले होते. आपण फरारी माफिया डॉन दाऊद इब्राहिम कासकरचा खास असल्याचा दावा देखील त्याने केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT