nitin gadkari corona positive Saam Tv
महाराष्ट्र

Nitin Gadkari: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह

नितीन गडकरी यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. गडकरी सध्या गृह विलीगीकरणात असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर - महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच कोरोनच्या नव्या ओमिक्रॉन (Omicron) या व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.ओमिक्रॉनची लागण झालेल्यांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या विषाणूचा फटका सर्वसामांन्यांपासून, बॉलिवूड कलाकार, मालिका विश्वातील अभिनेते-अभिनेत्री तसेच बड्या नेत्यांना देखील बसला आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना दुसऱ्यांदा कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. (Union Minister Nitin Gadkari Tested Corona Positive)

नितीन गडकरी यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. गडकरी सध्या गृह विलीगीकरणात असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचे आवाहन गडकरी यांनी केले आहेत. ट्वीट करुन त्यांनी याबाबाद माहिती दिली.

ट्विट करत ते म्हणले की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. मी सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करून स्वतःला होम क्वारंटाईन केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT