Nitin Gadkari 
महाराष्ट्र

वरिष्ठ गाढवाला घोडा म्हणत असेल तर...; नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले?

Nitin Gadkari donkey horse comment : नागपूरमधील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारमधील दबाव व मर्यादा यावर भाष्य करताना "वरिष्ठ गाढवाला घोडा म्हणत असेल तर तो घोडाच आहे" असे वक्तव्य केले. तसेच सह्याद्री अतिथीगृहाच्या कामाचं कौतुक करत ताजमहलपेक्षा सुंदर असल्याचं सांगितलं.

Namdeo Kumbhar

  • नितीन गडकरी यांचे "गाढवाला घोडा" विधान चर्चेत.

  • सरकारमध्ये वरिष्ठांचे निर्णय नेहमी मान्य करावे लागतात, असा गडकरींचा संकेत.

  • मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहाचं गडकरींकडून ताजमहलपेक्षाही सुंदर म्हणून कौतुक.

  • कंत्राटदार निवडताना राजकीय दबाव असतो, पण त्यातूनही चांगलं काम शक्य.

  • गडकरींच्या नागपूर भाषणामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चा.

Nitin Gadkari Statement on Bureaucracy & Work Culture : आपले वरिष्ठ गाढवाला घोडा आहे असं म्हणत असेल तर तो गाढव घोडाच आहे असे सांगायचे. कारण बॉस ऑलवेज करेक्ट असतो, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. ते नागपूरात इंडियन बिल्डिंग काँग्रेसतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. सरकारमध्ये आऊट ऑफ बॉक्स काम करणे किती कठीण आहे, हे मला माहित आहे. मलेशियातील इंजिनिअरने डिस्टेन्स टेक्नॉलॉजी आणली होती. वरील भीम त्यांनी स्टील फायबरमध्ये बनवले. त्यामुळे १२० मीटरपर्यंत डिस्टन्स वाढू शकते. ते करताना खूप घाम निघाला. चुकीचं किंवा आउट डेट असेल तरीही सरकार असेच चालवा म्हणते. सरकारमध्ये आजूबाजूला बघायचं नाही. सिनियर सांगतात ते करायचं. सिनियर गाढवाला घोडा म्हणत असेल तर तो गाढव घोडाच आहे, हे असे सांगायचे, असा माहोल असतो. कारण बॉस ऑलवेज करेक्ट, असे विधान नितीन गडकरी यांनी केले आहे.

कोणाला काम द्याच, असा राजकीय दबाव असला तरी मार्ग काढून काम करा

प्रत्येक कंत्राटदाराने चांगलं काम करावे. त्याचं श्रेय निश्चित मिळते, परंतु राजकारणांच्या जवळचे कंत्राटदार, आर्किटेक्ट यांना काम द्या, त्याला देऊ नका असं सांगत अधिकाऱ्यांवर दबाव असतो. मात्र त्यातूनही मार्ग काढता येऊ शकतो, असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईचे सह्याद्री अतिथिगृहाचे कामाचं कौतुक करताना ताजमहालापेक्षा सुंदर बांधलं असं सांगितलं.

मी अकरा वर्षे मंत्री राहिलो. पण काही चुका लक्षात यायला ११ वर्ष लागले. रोड बनताना डायव्हर्शन बनतो, तीन-तीन, पाच-पाच वर्षे त्या डायव्हर्शन सोडून हेवी वाहतूक होते. मुख्य रोडच्या तुलनेत डायव्हर्शनचं हे खूप लाईट डिझाईन असतं. याच डायव्हर्शनमुळे सोशल मीडियावर मात्र यावरून माझा कामावर टीका होते, असे गडकरी म्हणाले.

चांगलं काम केलं तर त्याचं क्रेडिट मिळत असते. पण अधिकाऱ्यांच्या काही मर्यादा असतात, कारण त्यांच्यावर राजकीय दबाव असतो. आमचे काही आर्किटेक्ट असतात, त्याला काम द्या, त्याला काम देऊ नका असे सांगणारे राजकारणी असतात. यामधूनही मार्ग काढून चांगलं काम केलं जाऊ शकतं. यावर उदाहरण देताना मुंबईतील सह्याद्री गेस्ट हाऊस राज्य बांधकाम विभागाकडून काम करण्यात आले. कादरी नावाचे आर्किटेक्ट यांनी ताजमहालापेक्षा सुंदर अतिथी गृह बांधलं, त्या कामाचं गडकरी यांनी अशा शब्दात कौतुकही केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Teacher Recruitment Scam: शिक्षणातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश! शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी|VIDEO

Maharashtra Live News Update: सोलापुरात पुन्हा एकदा तुफान पावसाला सुरुवात

Firing Case: दिशा पाटनीपासून ते सलमान खान पर्यंत; 'या' सेलिब्रिटींच्या घरावर कोण करतयं हल्ले?

Maratha VS OBC Conflict: नांदेडच्या रिसनगावात मराठा-ओबीसी वाद पेटला; आरक्षणाच्या लढाईमुळे गावात तणावग्रस्त वातावरण|VIDEO

Hair Spa At Home : पार्लरमध्ये 1000-2000 कशाला घालवताय? घरीच १० रूपयात करा हेअर स्पा

SCROLL FOR NEXT