Nitin Gadkari on Ramdas athawale  Saam tv
महाराष्ट्र

Nitin Gadkari : सत्ता कोणीचीही असो, रामदास आठवलेंना मंत्रिपदाची गॅरंटी; नितीन गडकरींच्या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकला, VIDEO

Vishal Gangurde

पराग ढोबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

नागूपर : 'आम्हाला चौथ्यांदा सरकार येण्याची गॅरंटी नाही, मात्र रामदास आठवलेंना आहे. सरकार कोणाचे आले तरी रामदास आठवले यांचे मंत्रीपद पक्के असते, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गंमतीने म्हणाले. नितीन गडकरी यांच्या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. ते नागपुरातील एका कार्यक्रमात बोलत होते.

नागपुरात मारवाडी फाऊंडेशनर्फे देण्यात येणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. सिव्हील लाईन येथील चिटणवीस सेंटरच्या बॅनियन सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.

नितीन गडकरी पुढे म्हणाले, 'लोकसभा निवडणुकीत आमचे सरकार येऊन त्यांना मंत्री होण्याची गॅरंटी आहे. मात्र आम्हाला मात्र नाही आहे. मी गंमतीने नेहमीच म्हणत असतो. राज्य कोणाचे आले तरी रामदास आठवले यांचे स्थान पक्के आहे. त्यावेळी लालूप्रसाद यादव हे रामविलास पासवान यांना म्हणाले होते की, रामदास आठवले हे राजकीय मौसमी शास्त्रज्ञ आहेत. राजकारणात पुढे काय होणार आहे, याची सर्व माहिती आठवलेंना असते, असा किस्सा त्यांनी सांगितला.

अन् आठवले झाले तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री

काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बाजी मारली. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३०० जागा जिंकल्या होत्या. तर संयुक्त पुरोगामी आघाडीनेही चांगल्या जिंकल्या. लोकसभेत ३०० जागा मिळाल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सत्तेवर दावा ठोकला. त्यानंतर झालेल्या शपथविधीत नरेंद्र मोदी यांच्यासहित नितील गडकरी, रामदास आठवले यांनीही केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MVA: मविआत उमेदवारीवरुन वादंग; राऊतांकडून पाचपुतेंना उमेदवारी जाहीर होताच शरद पवार यांनी सुनावलं

Pune Crime : बदलापूरनंतर पुण्यात संतापजनक प्रकार; ४ वर्षीय चिमुकल्यावर तरुणाचा अनैसर्गिक अत्याचार

Maharashtra News Live Updates : पुण्यातील पेठ परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

Nashik Crime : पतीच्या लटकत्या मृतदेहाखाली पत्नीची दुर्गापूजा? 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Maharahstra Politics: रश्मी ठाकरे भावी मुख्यमंत्री; मातोश्रीच्या परिसराबाहेरील बॅनरमुळे चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT