yuvraj sambhaji chhatrapati and sharad pawar saam tv
महाराष्ट्र

'राजे, यांचा डाव ओळखा..! हे पवार मराठ्यांचे कधीच झाले नाही'

संभाजीराजे यांनी आपण अपक्ष निवडणुक लढविणार असेच आधी जाहीर केले आहे.

Siddharth Latkar

सातारा : राज्य सभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून अपक्ष निवडणुक लढविणार असल्याचे काेल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती (yuvraj sambhajiraje chhatrapati) यांनी काही दिवसांपुर्वी पुण्यात (pune) जाहीर केले. त्यानंतर मंगळवारी राजेंनी महाराष्ट्रातील सर्व आमदारांना पत्र लिहून राज्य सभेच्या निवडणुकीत (rajya sabha election) मदत करावी असे आवाहन केले आहे. (sambhajiraje chhatrapati latest marathi news)

दरम्यान राजेंना ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) हे मदत करणार अशी एक क्लिप सध्या व्हायरल हाेत आहे. त्यामुळे संभाजीराजेंची वाट सुकुर हाेईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे. त्यातच शिवसेनेचे अनिल परब यांनी शिवसेनेचाच उमदेवार असेल असे जाहीर केले आहे.

दरम्यान भाजपचे नेते निलेश राणे (nilesh rane) यांनी ट्विट करुन राजेंना सावध करण्याचा प्रयत्न केला आहे. ते लिहितात कोल्हापूरचे (kolhapur) छत्रपती संभाजी महाराज राज्यसभेला अपक्ष उभे राहणार अशी घोषणा केली आणि लगेच पवार साहेबांनी आमची उरलेली मतं राजे ना देऊ सांगून राजेंना अडचणीत टाकलं. उरलेली मतं राजघराण्याला? राजे, यांचा डाव ओळखा आणि आत्ताच योग्य तो निर्णय घ्या कारण हे पवार मराठ्यांचे कधीच झाले नाही.

राणेंनी केलेल्या ट्विटवर त्यांचे समर्थक तसेच नागरिक देखील राजेंना सल्ला देऊ लागले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: 36 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! भारतीय ज्युडोपटूंचा इतिहास; अस्मिता डे आणि हर्ष सिंह यांची सुवर्णपदकाची कमाई

Maharashtra News Live: आदेश आला तर मंत्रीपद सोडण्याची तयारी- भरत गोगावले

गुलाबी अदा! प्राजक्ता माळीचे सुंदर फोटो पाहून नजर हटत नाही

BJP: मोठी बातमी! भाजपला मोठा हादरा, आमदाराचा तडकाफडकी राजीनामा

नीट पेपर फुटतो कसा? सुप्रिया सुळेंचा आक्रमक सवाल; सरकारला या २ गोष्टी सूचवल्या, बघा VIDEO

SCROLL FOR NEXT