Nitesh Rane warns the police Saam Tv
महाराष्ट्र

Mulund: २४ तास पाेलीसांना सुटी द्या, मग बघा! राणेंचा ठाकरेंना इशारा

आज नितेश राणेंनी किरीट साेमय्यांची भेट घेतली.

Siddharth Latkar

मुंबई : भाजप नेते किरीट साेमय्या (kirit somaiya) यांच्यावर शनिवारी झालेल्या हल्ल्याचा सर्वत्र भाजप नेते निषेध नाेंदवित आहेत. आज (रविवार) आमदार नितेश राणे (nitesh rane) हे साेमय्यांच्या भेटीसाठी मुलुंड (mulund) येथे त्यांच्या निवासस्थानी गेले आहेत. त्यापुर्वी राणेंनी ट्विट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (uddhav thackeary) टीका करीत २४ तास पाेलिसांना (police) रजेवर पाठवा मग बघा परिस्थिती कशी आटाेक्यात आणू असा इशारा दिला आहे. (kirit somaiya latest marathi news)

साेमय्या हे खासदार नवनीत राणा (navneet rana) आणि आमदार रवी राणा (ravi rana) यांना भेटण्यासाठी शनिवारी खार पोलीस ठाण्यात (khar police staion) गेले हाेते. तेथे त्यांच्या वाहनावर हल्ला झाला. हा हल्ला शिवसैनिकांनी (shivsainik) केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.

त्यावर आज भाजपचे आमदार नितेश राणेंनी तीव्र भावना व्यक्त करीत दरराेज भाजपच्या नेत्यांवर ठाकरेंच्या गुंडांकडून पाेलीस सरंक्षणात हल्ले केले जात असून हे कूठले शाैर्य. माताेश्रीत बसलेले आणि स्वत:ला मर्द समजणा-यांनी पाेलीसांना २४ तास सुटीवर पाठवावे मग बघा कशी परिस्थिती नियंत्रणात आणू असे ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbaicha Raja : 'मुंबईचा राजा...' म्हणू नका! रोहित शर्मानं चाहत्यांना रोखलं, VIDEO

Weight Gain : जेवणाच्या या चुकीच्या सवयींमुळे वाढेल वजन; वेळीच व्हा सावध

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

SCROLL FOR NEXT