nitesh rane , sanjay raut, sindhudurg news saam tv
महाराष्ट्र

Nitesh Rane vs Sanjay Raut : शकुनी मामा, सूर्याजी पिसाळने घराघरांत आग आणि काड्या लावणे बंद करावे; नितेश राणेंचा संजय राऊतांना टाेला

आमदार नितेश राणेंनी आज (साेमवार) सिंधुदूर्ग येथे माध्यमांशी संवाद साधला.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Nitesh Rane News : एकाबाजूला ज्येष्ठ नेत्यांना विठ्ठल म्हणायाचे आणि त्यांच्याच घरात भांडणे लावण्याचे काम शकुनी मामा संजय राऊतांनी (mp sanjay raut) केले. आग आण काड्या लावण्याचे काम स्वत:हून बंद करुन मग इतरांना संजय राऊत यांनी सल्ला द्यावा असे भाजप आमदार नितेश राणे (mla nitesh rane latest marathi news) यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना म्हटलं. राणे यांनी आज (साेमवार) सिंधुदूर्ग (sindhudurg) येथे माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांवर टीकास्त्र साेडले. (Maharashtra News)

आमदार नितेश राणे म्हणाले शिंदे साहेबांना किती त्रास द्यायचा हे आमच्या मित्र पक्षाने ठरवावे. फडणवीस साहेबांनी काय निर्णय घ्यावा हे त्यांना संगण्याऐवढे आपण मोठे नाही. ह्या तिघांना काम करू द्या. उगाच बडबड करू नका आणि राऊतांना फुलटाॅस देऊ नका असे राणेंनी आमदार संजय शिरसाट यांनी फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.

राणे म्हणाले संजय राऊत हा शकुनी मामा, सूर्याजी पिसाळ आहे. बाळासाहेब तुझेही विठ्ठल होते ना मग त्यांचं घर का फोडले असा सवाल करीत संजय राऊत यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये भांडण लावून दिली. आता आदित्य आणि तेजस यांच्यात भांडणे का लावताय असा सवाल राणेंनी राऊतांना केला.

पवार साहेबांसोबत देखील तेच केले. एकाबाजूला शरद पवार यांना विठ्ठल म्हणताेस ना मग सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात का भांडण लावताेयस. जिकडे जाताेस तिकडचे घर फाेडताेस असली काड्या टाकण्याची कामे बंद कर आणि मग दूस-यांना सल्ले दे असेही राणेंनी (nitesh rane) राऊत यांच्यावर टीका करता नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Fort : कुछ तुफानी करते है! 'हा' किल्ला चढताना काळजाचा ठोका चुकतो, २,२५० फूट उंचीवरचा थरारक ट्रेक

Maharashtra News Live Update: साखरेच्या दरवाढीत २२ ते २५ हजार कोटींचा घोटाळा? राजू शेट्टींचा गंभीर आरोप

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी खुशखबर, कोणत्याही क्षणी खात्यात हप्ता जमा होणार; सरकारने घेतला मोठा निर्णय

Swine flu symptoms: देशभरात वाढतोय स्वाईन फ्लूचा धोका; ही 4 लक्षणं दिसली तर लगेच व्हा सावध

September Picnic Spots : सप्टेंबरमध्ये फिरण्यासाठी 'ही' ५ ठिकाणं ठरतील बेस्ट, आजच प्लान करा ट्रिप

SCROLL FOR NEXT