Nitesh Rane, Uddhav Thackeray, Anil Parab, Shivsena saam tv
महाराष्ट्र

Nitesh Rane News : कोणाच्याही घरात पाळणा हलू द्या, ठाकरे गट पेढे वाटायला पुढं : नितेश राणे

Dasara Melava 2023 : बाळासाहेबांच्या नावाने मोठी मोठी बाता करता. मात्र आदित्यला शिवतीर्थावर जावून त्यांना अभिवादन करता आले नाही असेही राणेंनी म्हटलं.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Sindhudurg News : आजकाल महाराष्ट्रात कोणाच्याही घरात पाळणा हलला की ठाकरे गट पेढे वाटायला सुरुवात करतात. मुख्यमंत्र्यांनी असाे अथवा विधान सभा अध्यक्ष असाे त्यांनी त्यांचे नियाेजीत परदेश दाैरे करत केले. हे दाैरे आमच्यामुळे रद्द झाल्याची आवाई ठाकरे गट उठवू लागल्याचे आमदार नितेश राणे (nitesh rane latest marathi news) यांनी नमूद केले. राणेंनी सिंधुदूर्ग येथे आज (शनिवार) माध्यमांशी संवाद साधला. (Maharashtra News)

राणे म्हणाले मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाला तर पेंग्वीन ठाकरे (आदित्य ठाकरेंना संबाेधून) म्हणतो आमच्यामुळेच झाला. खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आज घाणा देशाबद्दल व्यक्त केले. मग तुमचा मालक मुख्यमंत्री असताना कोरोना काळात जे लाखो मृत्यूमुखी झाले ते निष्काळजीपणामुळे झाले. त्यामुळे त्यांच्यात आणि घाणाच्या इतिहासात काही फरक नाही असे नितेश राणेंनी म्हटलं.

हा चायनीज मॉडेल शिवसैनिक, जाे दुस-याला लुच्चा लफंगा म्हणताे ताेच सर्वांत माेठा लुच्चा लफंगा आहे अशी खासदार संजय राऊत यांच्यावर नितेश राणेंनी टीका केली. ते म्हणाले दसरा मेळावा (dasara melava shivsena) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांना शिवतीर्थावर (shivtitrth) घेण्याची कोर्ट परवानगी देईल असेही राणेंनी म्हटले.

ज्यांनी शिवतिर्थावर दावा (Dasara Melava 2023) केला आहे. त्यांनी एखादा छाेटासा हाॅल मित्र मंडळींच्या नावावर बुक करुन तेथे दसरा मेळावा घ्यावा असेही राणेंनी राऊतांना टाेला मारला. उबाठाचे लफंगे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे नाही हे सर्वश्रुत असल्याचे हे राणेंनी म्हटले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT