आदित्य ठाकरेंवर केलेल्या टिकेबद्दल नितेश राणे यांनी मागितली माफी SaamTv
महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंवर केलेल्या टिकेबद्दल नितेश राणे यांनी मागितली माफी

भाजप आमदार नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर अगदी टोकाची टीका केली. यामुळे शिवसैनिकांनी आंदोलन दिल्यानंतर अखेर नितेश राणे यांनी माफी मागितली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वैदेही काणेकर

मुंबई - भाजप आमदार नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर अगदी टोकाची टीका केली. यामुळे शिवसैनिकांनी आंदोलन दिल्यानंतर अखेर नितेश राणे यांनी माफी मागितली. पहिल्यांदाच नितेश राणे यांनी ठाकरे यांची माफी मागितली असं दिसून आलं आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर राणे कुटुंबीय आणि ठाकरे कुटुंब यांच्यात सतत वाद दिसून आले. दोन्हीकडून आजवर अत्यंत खालच्या थराला जाऊन अनेकदा टीका टिपण्णी देखील करण्यात आली. मात्र केलेल्या टीकेबाबत माफी मागण्याचा प्रकार हा पहिल्यांदाच घडून आला आहे. Nitesh Rane apologizes for criticizing Aditya Thackeray

हे देखील पहा -

पावसाळी अधिवेशनामध्ये भास्कर जाधवांनी 12 राडेबाज आमदारांना निलंबित केल्यानंतर भाजपने विधानभवनाच्या पायरीवर प्रति विधानसभा भरवली. यातच भाषण करताना नितेश राणे यांचा तोल सुटला आणि आदित्य ठाकरे यांच्याविषयी अत्यंत खालच्या थराला जाऊन टीका केली

नितेश राणे यांनी केलेल्या टीकेनंतर मुंबईतील आणि शिवसेनेची आंदोलने दिसून आली युवा सेनेतर्फे मुंबईत ठिकाणी नितेश राणे यांच्या विरुद्ध आंदोलन करण्यात आलं. यानंतर नितेश राणे यांनी ट्विट करत केलेल्या विधानाच्या संदर्भात क्षमा मागितली आहे.

विधानसभेच्या बाहेर माझ्या कालच्या भाषणात मी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख केला होता. तू बरेच जण आणि चुकीच्या पद्धतीने घेतला. यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द परत घेतो. अश्या आशयाचे ट्विट त्यांनी केलं आहे.

एकीकडे शिवसेना विरुद्ध भाजप या दोन्ही पक्षांचा वाद अगदी टोकाला पोहचला आहे. अशातच शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी राणे कुटुंबियांकडून सोडण्यात येत नाही. मात्र इतक्या वर्षात पहिल्यांदाच अशा पद्धतीने नितेश राणे यांनी जाहीर माफी मागितल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT