Nitesh Karale latest news saam tv
महाराष्ट्र

Nitesh Karale Crying : ६ वर्षासाठी राष्ट्रवादीतून हाकालपट्टी, कराळे मास्तर ऑन कॅमेरा ओक्साबोक्शी रडले

Nitesh Karale latest new : नितेश कराळे मास्तर यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यानंतर ते पत्रकार परिषदेत भावूक झाले. पक्षासाठी ११० सभा घेतल्याचा दावा करत त्यांनी कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली. काँग्रेसच्या दबावाचा संशयही त्यांनी व्यक्त केला.

Namdeo Kumbhar

चेतन व्यास, वर्धा प्रतिनिधी

Nitesh Karale Master : नागपूर पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार नितेश कराळे मास्तर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडली. पण यावेळी बोलताना ते प्रचंड भावूक झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला होता. ते ऑन कॅमेरा ढसाढसा रडले. राष्ट्रवादीने केलेल्या या कारवाईची माहिती आपल्याला माध्यमांतूनच मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हकालपट्टीची खंत

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या काळात आपण पक्षासाठी राज्यभर प्रचार केला. स्वतःच्या क्लासकडे दुर्लक्ष करून पक्षाच्या विजयासाठी आपण तब्बल ११० सभा घेतल्या. मात्र या सगळ्या मेहनतीची परतफेड पक्षानं हकालपट्टी करून केल्याची खंत कराळे यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आदर व्यक्त करत त्यांनी पक्षाच्या निर्णयाचा स्वीकार केला, परंतु ही कारवाई पूर्णपणे चुकीची असल्याचे मत त्यांनी मांडले.

शंभरहून अधिक पोलीस केसेस

सर्वसामान्यांसाठी लढा देताना आपल्यावर शंभरहून अधिक पोलीस केसेस दाखल झाल्या, दोन अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले आणि आठ दिवसांचा तुरुंगवासही भोगला. हे सर्व जनतेसाठी लढल्याचे आपल्याला मिळालेले 'बक्षीस' असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मात्र, या बिकट परिस्थितीत किंवा तुरुंगवास भोगत असताना पक्षातील कोणत्याही मोठ्या नेत्याने साधी विचारपूसही केली नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

काँग्रेसचा दबाव असल्याचा संशय

या संपूर्ण कारवाईमागे काँग्रेस पक्षाचा दबाव असण्याची दाट शक्यता असल्याचे त्यंनी सांगितले. काँग्रेसने आपल्याला मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात मदत न करण्याची भूमिका घेत कारवाईची मागणी केल्याची माहिती मिळाल्याचे कराळे यांनी स्पष्ट केले.

आपण नेहमीच जनतेच्या हितासाठी आणि हक्कासाठी लढलो असून, आता जनता आणि मतदारच उद्याच्या मतदानातून या अन्यायाला चोख उत्तर देतील आणि आपल्याला मोठ्या मताधिक्याने विजयी करतील, असा ठाम विश्वास नितेश कराळे यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे विभागीय पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची सातारा जिल्ह्यात तयारी पूर्ण

पशुपालनाचा व्यवसाय करायचाय? शेळी-मेंढीपालनासाठी ७५ टक्के तर गाई-म्हैशींसाठी अनुदान किती मिळतं?

पुणे शिक्षक निवडणुकीत ट्विस्टवर ट्विस्ट! सानप बाजी मारणार की सावंतांची बंडखोरी ठरणार निर्णायक? डार्क हॉर्स’ ठरणार कोण?

Running or Swimming: हृदय निरोगी ठेवण्यासाठी धावणं की पोहणं? कोणता व्यायाम ठरतो अधिक फायदेशीर?

संगीत क्षेत्राला मोठा धक्का! दिग्गज गायकाचे निधन, सिनेसृष्टीत हळहळ

SCROLL FOR NEXT