shivthar saam tv
महाराष्ट्र

शिवथरला नऊ महिन्याचे अर्भक मृतावस्थेत सापडले; घटनास्थळी ग्रामस्थांची जमली गर्दी

या प्रकरणाचा सातारा पाेलीस तपास करीत आहेत.

ओंकार कदम

सातारा : शिवथर (shivthar) येथे एका घरासमोर नवजात अर्भक मृत अवस्थेत आढळल्याने गावात खळबळ माजली. हे अर्भक कुणाचे आणि याचा मृत्यू कसा झाला असे अनेक प्रश्न ग्रामस्थांना भेडसावू लागले आहेत. दरम्यान या प्रकरणाचा सातारा तालुका पोलीस (satara police) तपास करीत आहेत. (satara latest marathi news)

शिवथर येथील भर वस्तीत असणा-या एका घराच्या दरवाज्याजवळ मृत अर्भक आढळल्याची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली. या घटनेची माहिती सातारा (satara) तालुका पोलीस ठाण्यात कळल्यानंतर पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल पाेहचली.

सातारा तालुका पोलीस (police) ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी, पीएसी दळवी व त्यांचे सहकारी यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र शिवथर येथील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अंदाजे नऊ महिन्याचे अर्भक आहे. या अर्भकाचा मृत्यू झालेला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Flood: शेतकऱ्यांसाठी पुढच्या २ दिवसांत ठोस निर्णय घेणार, उमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा आझाद मैदानाऐवजी नेस्कोमध्ये होणार

स्पेसक्राफ्ट एका दिवसात किती फेऱ्या मारतं?

Crime News: बॉक्सर मेरी कोमच्या घरी चोरी, ३ अल्पवयीन मुलांना अटक; चोरीस गेलेल्या वस्तू जप्त

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून गेले शिंदेंचे आमदार, लाखोंची प्रॉपर्टी विकून केली मदत; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT