Nilesh Rane saam tv
महाराष्ट्र

Nilesh Rane: लायकीत राहायचं… निलेश राणे कडाडले, भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांना थेट सुनावलं!

Shiv Sena BJP dispute: एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून आमदार निलेश राणे यांनी भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांच्यावर टीका केली आहे. 'तुझं करिअर आत्ताच सुरू झालंय' असा इशारा देत राणेंनी शिवसेना-भाजप युतीतील जुन्या घटनांचाही उल्लेख केला.

Surabhi Jayashree Jagdish

शिवसेना आणि भाजपमधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नवनाथ बन यांना नाही, असं म्हणत राणेंनी त्यांच्यावर टीका केली. 'तुझं करिअर आत्ताच सुरू झालंय, कशाला संपवतोयस स्वतःहून?' असा सवालही त्यांनी केला. तसंच नवनाथ बन यांनी शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं, तुझी लायकी किती तू बोलतो किती, असा इशाराही निलेश राणे यांनी दिलाय.

नवनाथ बन हे सातत्याने शिवसेनेवर विनाकारण आरोप करत असल्याचं निलेश राणे म्हणाले. शिंदे साहेबांवर बोलण्याचा अधिकार नवनाथ बन यांना नाही. ते भाजपचे प्रवक्ते आहेत, त्यामुळे त्यांनी प्रवक्त्याचं काम करावं, असं राणेंनी सुनावलं. आम्ही भाजपच्या कोणत्याही नेत्याला निवडणुकीतील पराभवासाठी जबाबदार धरलेलं नाही. एखाद्या निवडणुकीत नियोजन कमी पडलं आणि त्यामुळे एखादी जागा गेली तर त्याचं आत्मपरीक्षण करायचं असतं. पण आम्ही कधीही पराभवाचं खापर एखाद्या नेत्यावर फोडलेलं नाही, असंही ते म्हणाले.

'शिंदे साहेबांवर बोलण्याचा अधिकार तुला कोणी दिला?'

एकनाथ शिंदे यांचं नाव घेऊन त्यांना या प्रकरणात मूकसंमती आहे का, असा प्रश्न नवनाथ बन यांनी उपस्थित करू नये, असं निलेश राणे म्हणाले. शिंदे साहेबांचं नाव घेण्याची संमती तुला भाजपमधून कोणी दिली, हे आधी स्पष्ट कर, असं आव्हान त्यांनी बन यांना दिलं.

निवडणुकीत नियोजन कुठे चुकलं आणि आत्मपरीक्षण कसं करायचं, हे भाजपने ठरवायचं आहे. त्यात शिवसेनेला शिकवण्याची गरज नाही, असंही राणे म्हणाले. शिंदे साहेबांवर पुन्हा बोललास, तर केवळ जशास तसं उत्तर देण्यापुरतं मर्यादित राहणार नाही, असं सांगत त्यांनी बन यांना इशारा दिला.

'आता कुठे तुझं करिअर सुरू झालंय. नको त्या वाटेला जाऊ नकोस. अंगाशी आलं, तर नंतर रडायलाही वेळ मिळत नाही,' अशा शब्दांत राणेंनी नवनाथ बन यांना सुनावलं.

'नवनाथ बन माझा मित्र नाही, तो माझ्यापेक्षा ज्युनिअर'

नवनाथ बन यांनी त्यांना मित्र म्हटल्याच्या मुद्द्यावरही निलेश राणेंनी उत्तर दिलं. 'पहिली गोष्ट म्हणजे तो माझा मित्र नाही, तो माझ्यापेक्षा ज्युनिअर आहे. मी २००९ मध्ये खासदार झालो, तेव्हा तो शाळेत होता,' असं राणे म्हणाले. मी ऐऱ्यागैऱ्यांना मित्र बनवत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

नवनाथ बन यांनी आम्हाला काम कसं करायचं, हे शिकवू नये. त्याला उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही. आम्ही आमच्या नेत्यांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना उत्तर देऊ. तू कोण आहेस, असा सवाल करत राणेंनी पुन्हा बन यांच्यावर टीका केली.

'शिवसेनेने भाजपचा घात केला तर अनेक पुस्तकं उघडतील'

शिवसेनेने भाजपचा घात केल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला होता. यावर उत्तर देताना निलेश राणे यांनी युतीतील जुन्या घटनांचा उल्लेख केला. 'इतर वेळी काय काय झालं, हे आम्ही सांगायला गेलो, तर अनेक पुस्तकं उघडतील. माझ्या मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी काय झालं, हे सांगायला गेलो तर अनेक गोष्टी समोर येतील. सध्या दोन्ही पक्ष युतीमध्ये आहेत. एकमेकांचे मित्र, सहकारी आणि कुटुंब म्हणून आपण एकत्र आहोत. त्यामुळे जुन्या गोष्टी काढून त्यावर चर्चा करण्याची गरज नाही, असं राणेंनी सांगितलं.

पूर्णेकरांच्या विषयात भाजपने एकनाथ शिंदे यांची बाजू घेतली होती का, असा सवालही त्यांनी नवनाथ बन यांना केला. शिंदे साहेबांवर आरोप होत असताना आणि त्यांच्याबद्दल चुकीची भाषा वापरली जात असताना बन यांना वाईट वाटलं नाही का, असं राणे म्हणालेत. तुम्ही त्यांना मित्र आणि सहकारी म्हणता, तर सहकाऱ्याप्रमाणे वागा, असा सल्लाही त्यांनी दिला.

'तू बोलायला गेलास, तर आमच्याकडेही सांगण्यासारखं बरंच काही आहे. पण आम्हाला त्या विषयात जायचं नाही. भारतीय जनता पक्ष हा आम्हालाही आपलाच पक्ष वाटतो. त्या पक्षासाठी आम्हीही मेहनत घेतली आहे. आम्ही त्या पक्षाला काहीतरी देणं लागतो. आम्हाला कोणीतरी येऊन उत्तरं मागावीत असं चालणार नाही. आमचे नेते प्रश्न विचारतील, तेव्हा आम्ही उत्तर देऊ. प्रत्येक निवडणुकीतील गोष्टी बाहेर काढायच्या ठरवल्या, तर अनेक पुस्तकं उघडावी लागतील. पण त्याचा फायदा विरोधकांना होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

'नवनाथ बन अजून नवीन आहे, त्याला मर्यादा कळायला हव्यात'

नवनाथ बन यांनी कोणत्या गोष्टी बोलाव्यात आणि कोणत्या बोलू नयेत, याची मर्यादा समजून घ्यायला हवी, असं निलेश राणे म्हणाले. विरोधकांना किती फायदा करून द्यायचा आणि किती नाही, याचा विचार करण्याची गरज आहे. बन हे आधी पत्रकारितेत होते. त्यांनी नुकतीच पहिली निवडणूक जिंकली आहे. मात्र ते कसे जिंकले, हेही कधीतरी सांगू असं म्हणत राणेंनी त्यांच्यावर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Udta Teer Review: देशभक्ती, कॉमेडी अन् सस्पेन्सचा तडका! आयुष्मान-साराच्या 'उड़ता तीर'चा जाणून घ्या रिव्ह्यू

Maharashtra News Live Update: पुणे शिक्षक मतदारसंघातून विजयी झालेले आमदार कौस्तुभ गावडे भाजप नेत्यांच्या बैठकीला

Pradeep Purnekar Case: पूर्णेकरांच्या हत्येच्या कटात मीनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीचा सहभाग, ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप

Samruddhi Expressway Protest: समृद्धी महामार्ग ठाकरेसेनेचा रास्तारोको; नितीन देशमुखांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखलं!

Bank Holiday: उद्या ३१ ऑक्टोबरला बँकेत जाण्याआधी थांबा! बँका बंद की सुरू? लगेचच घ्या जाणून

SCROLL FOR NEXT