Nilesh Rane, Bhaksar Jadhav  saam tv
महाराष्ट्र

Video : 'भास्कर जाधव नाक्यावरचा लुक्का'; निलेश राणेंची शिवराळ भाषेत टीका

कोकणात आता पुन्हा एकदा जाधव विरुद्ध राणे असा संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- जितेश कोळी

Nilesh Rane : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव (bhaskar jadhav) यांनी शिंदे-फडणवीस सरकार मधील मुख्य नेत्यांच्या मिमिक्री केल्यानंतर माजी खासदार निलेश राणे (nilesh rane) यांनी भास्कर जाधव यांच्यावर शिवराळ भाषेत टीका (Rane Vs Bhaskar Jadhav) केली आहे. राणेंनी व्हिडिओ ट्विट (tweet) करून जाधव यांना औकातीत राहा असा इशारा दिला आहे.

राणेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी भास्कर जाधव यांना उद्धव ठाकरे यांचा आयटम गर्ल आहेस का असा प्रश्न विचारला आहे. जाधव यांना राणेंनी तू आम्हांला ताेंड उघडायला लावू नकाेस असा इशारा दिला आहे.

राणे यांनी शिवराळ भाषा वापरत भास्कर जाधव हे त्यांच्या कुटुंबाचे हाेऊ शकले नाहीत तर उद्धव ठाकरेंचा काय हाेणार असे म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंना लाेक कळलेच नाही असे म्हणत म्हणून तूला त्यांनी ठेवलं आहे असेही राणेंनी नमूद केले.

दरम्यान माजी खासदार निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांनी केलेल्या नकलेचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यामुळे कोकणात आता पुन्हा एकदा जाधव विरुद्ध राणे (Rane Vs Bhaskar Jadhav) असा संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis: आता एकही चूक खपवून घेतली जाणार नाही; CM फडणवीसांचा मंत्र्यांना सज्जड दम|VIDEO

Bhandara : शाळेत जाताना विद्यार्थिनीवर काळाची झडप; चिखलात सायकल स्लिप होताच ट्रॅक्टरची धडक, विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

Nagpur Food : नागपूरच्या अशा Top 8 डीशेस ज्या पाहताच तोंडाला सुटेल पाणी

Kolhapuri Chappal: सहज ओळखता येणार कोल्हापुरी; कोणी-कुठे बनवली चप्पल तेही कळणार

भावंडं खेळत होती, नराधमानं बागेत नेलं, १० वर्षीय चिमुकलीचे लचके तोडले; मुंबईत खळबळ

SCROLL FOR NEXT