rahul kanal and aaditya thackeray saam tv
महाराष्ट्र

आता 'या' विभागांनी देखील राहूल कनालच्या घरावर छापे मारले पाहिजेत : निलेश राणे

कनाल यांच्यावरील कारवाईनंतर राणे बंधू आक्रमक झाले आहेत.

साम न्यूज नेटवर्क

कणकवली : आदित्य ठाकरेचा पुरवठामंत्री राहुल कनाल (Rahul Kanal) अगोदर बाबा सिद्दिकीच्या चपला उचलायचा. अचानक शिवसेनेत (shivsena) गेला आणि पेंग्विनच्या जवळ गेला. कोरोना (corona) काळात अनुभव नसताना वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून पैसे कमावले पण कनाल विसरला नियती मेलेल्या माणसाच्या नावावर पैसे कमवणा-याला सोडत नाही अशी जहरी टीका भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी कनाल यांच्याबाबत केली आहे.

युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी आज (मंळगवार) सकाळी आयकर विभागाने (income tax department) छापा टाकला. कनाल हे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय समजले जातात. कनाल यांच्यावरील कारवाईनंतर राणे बंधू (nitesh rane) (nilesh rane) आक्रमक झाले आहेत. (rahul kanal latest marathi updates)

माजी खासदार निलेश राणे (nilesh rane) यांनी ट्विट करुन राहुल कनाल हा व्यक्ती बांद्रा या भागात कोणालाही विचारलं तरी कळेल याचे खरे धंदे काय. नाईटलाइफ गॅंग मधला हा प्रमुख, स्वतः हुक्का पार्लर चालवतो आणि त्या माध्यमातून घाणेरडे धंदे करतो असा आराेप कनाल यांच्यावर केला आहे.

आयकर विभागासह नारकोटिक्स डिपार्टमेंट आणि वुमन राईट कमिशन विभागाने पण या राहुल कनालच्या घरावर आणि ऑफिसवर छापे मारले पाहिजे अशी अपेक्षा देखील राणेंनी ट्विट करुन व्यक्त केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Romantic Zodiac Sign Boys: या 4 राशींची मुलं असतात रोमॅटिंक, मुली स्वत:हून त्यांच्यावर होतात इम्प्रेस

Nagpur : 'मी तुमच्यावर खूप प्रेम करते…'; विवाहित महिलेने आयुष्य संपवलं, नागपुरात खळबळ

राज्यात चाललंय काय? नगसेवकाकडून तिघांवर कोयत्याने वार, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Ladki Bahin Yojana: एप्रिल महिना सुरु; तरी मार्चचा हप्ता मिळाला नाही; लाडक्या बहि‍णींना ₹१५०० कधी मिळणार?

Maharashtra News Live Update: अजितदादाचं निवडणूक लढवत आहे, असं समजा... सुनेत्राकाकीसाठी रोहित पवारांची भावनिक पोस्ट

SCROLL FOR NEXT