Ajit Pawar Saam TV
महाराष्ट्र

Ajit Pawar: 'अजित पवारांना फक्त कारखाने कसे लुटायचे ते माहीतेय'

'अजित पवार हे अर्थ खात्यासाठी योग्य नाहीत, त्यांना अर्थ खातं किती कळतं ते माहीत नाही.'

अमोल कलये.साम टीव्ही रत्नागिरी

रत्नागिरीः : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना नोटीस पाठवल्या प्रकरणारती बोलताना भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी राज्य सरकारवर टिका केली तसंच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप केले. ते म्हणाले, अजित पवार (Ajit Pawr) हे अर्थ खात्यासाठी योग्य नाहीत, त्यांना अर्थ खातं किती कळतं ते माहीत नाही अशी टीका करतच पवारांना फक्त कारखाने लुटायचं माहित आहे असा गंभीर आरोप राणे (Nilesh Rane) यांनी केला, ते आज चिपळूणमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

'पवार हे अर्थ खात्यासाठी योग्य नाहीत. त्यांना अर्थ खातं किती कळतं ते माहीत नाही, पण अलोकेशन ऑफ फंड म्हणजे बजेट नव्हे. मी स्वतः फायनान्सचा विद्यार्थी. मला बजेट (Budget) माहीत आहे. अलोकेशन ऑफ फंड म्हणजे इम्प्लिमेंट ऑफ फंड नाही.

मराठी भवनासाठी (Marathi Bhavan) प्रत्येक वेळी निधी जाहीर होतो, पण आजवर एकही विट रचलेली नाही. कोकणातील गडकिल्ल्याना फक्त निधी जाहीर करतात. प्रत्यक्षात किल्ले ढेपाळत आहेत. वित्तीय तुट कशी झाली यावर अजित पवार बोलतील का? त्यांना फक्त कारखाने कसे लुटायचे ते माहीत. अशी गंभीर टीका निलेश राणे यांनी केली. दरम्यान, संजय राऊत हे शिवसेनेला (Shivsena) संपवून राष्ट्रवादीचे (NCP) खासदार होतील ते १०० टक्के पवारांचा माणूस असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची ₹51000 बेसिक सॅलरी होणार, आठव्या वेतन आयोगाची नवी मागणी आली समोर

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरात सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

पहिल्यांदा नोकरी मिळवणाऱ्यांना १५ हजारांची मदत; ७० लाख तरुणांना फायदा मिळवून देणारी 'PM-VBRY' योजना काय आहे?

Kidney Health: ही 5 मोठी लक्षणं दिसली तर समजा तुमची किडनी खराब होतेय!

फुटीर खासदारांसोबत बैठक कुठे झाली? 'ऑपरेशन टायगर'मागे कुणाची रणनीती? पहिला फोटो आला समोर

SCROLL FOR NEXT