Nilesh Rane Saam TV
महाराष्ट्र

Konkan Politics: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून कोणाला उमेदवारी? राणेंनी २ इच्छुक नेत्यांची नावं घेतली

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Sindhudurg News :

सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात (Ratnagiri–Sindhudurg Lok Sabha Constituency) भाजप आणि शिंदे गट हे एकत्रच निवडणूक लढवणार आहेत. दाेन्ही पक्षातील नेते निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे माजी खासदार निलेश राणेंनी (nilesh rane latest marathi news) नमूद करीत पक्षश्रेष्ठी त्यांच्याबाबत निर्णय घेतील असेही कुडाळ येथे माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले. दरम्यान आमदार वैभव नाईक (mla vaibhav naik) यांची दखल घ्यावी इतके त्यांचे कार्य नसल्याचे निलेश राणेंनी नाईकांनी नारायण राणे (mp narayan rane) यांच्यावर केलेल्या टीकेबाबत मत व्यक्त केले. (Maharashtra News)

माजी खासदार निलेश राणे म्हणाले सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात उमेदवार ठरविण्याचा सर्वाधिकार हा वरिष्ठांचा आहे. भाजप आणि शिंदे यांची शिवसेना हे एकत्रच निवडणूक लढवणार आहेत.

लाेकसभेसाठी जठार, सामंत इच्छुक

या निवडणुकीसाठी प्रमोद जठार (pramod jathar) व किरण सामंत (kiran samant) इच्छुक आहेत. ज्यांना कोणाला उमेदवारी मिळेल त्याचा दोन्ही पक्ष एकत्रितपणे प्रचार करतील आणि विजय मिळवतील असा विश्वास माजी खासदार निलेश राणेंनी व्यक्त केला.

वैभव नाईक दखलपात्र नाही

आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंवर टीका करताना राणेंनी तेव्हा कॉंग्रेस संपवली व आता ते भाजपला संपवतील अशा टीका केली होती. यावर उत्तर देताना माजी खासदार निलेश राणे म्हणाले वैभव नाईक हे दखलपात्र नाही आणि त्यांचं कार्य सुद्धा दखल घेण्यासारखं नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नारायण राणेंसारख्या केंद्रीय नेत्यांवर बोलण्याची त्यांची कुवत नाही. संपलेल्या पक्षाचे ते आमदार आहेत. रिकामटेकडे असल्याने ते बाेलत सुटलेत असेही राणेंनी म्हटले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंगळ ग्रहाला का म्हटलं जातं रेड प्लॅनेट?

Assembly Election: विधानसभेच्या मैदानात 'तुतारी'चाच आवाज! उमेदवारीसाठी तब्बल १६०० अर्ज; शरद पवारांकडून मुलाखतींचा धडाका

Baby Names Inspired by Flowers : सुगंधी आणि नाजूक फुलांवरून मुलींच्या नावाची यादी

Uddhav Thackeray: तुमच्या डोळ्यावरचं झापड पुसलं गेलं, शिंदे गटातून कार्यकर्ते परतले; ठाकरे काय म्हणाले?

Accident : कार- टेम्पोचा भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT