Vaibhav Naik rejects Nilesh Rane claim about joining Shinde Sena Saam TV
महाराष्ट्र

Politics : २०२४ मध्ये माजी आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार होता; शिंदेसेनेच्या आमदाराचा गौप्यस्फोट, राजकारणात खळबळ

Nilesh Rane vs Vaibhav Naik maharashtra Politics : २०२४ च्या निवडणुकीत ठाकरे सेना सोडून वैभव नाईक शिंदेसेनेकडून निवडणूक लढणार होते, असा गौप्यस्फोट आमदार नीलेश राणेंनी केला. त्यामुळं कोकणातील राजकारण ढवळून निघालंय.

Nandkumar Joshi

विनायक वंजारे, सिंधुदुर्ग | साम टीव्ही

महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदेसेना आणि ठाकरे सेनेत 'इनकमिंग-आउटगोईंग'ची अहमहमिका सुरू असतानाच, शिंदेसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी ठाकरेंच्या माजी आमदाराबाबत गौप्यस्फोट करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. माजी आमदार वैभव नाईक हे शिंदेंच्या शिवसेनेतून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण मतदारसंघातून लढायला तयार होते, असं राणे म्हणाले.

वैभव नाईक हे अँटी चेम्बरमध्ये येऊन बसायचे. त्यांच्या बैठका पण झाल्या होत्या. फक्त एबी फार्म घ्यायचा बाकी होता. मात्र मी मालवणमधून निवडणूक लढवावी यासाठी उदय सामंत यांनी माझं प्रेझेन्टेशन शिंदे साहेबांकडे केलं. त्यामुळेच मी कुडाळ-मालवण मतदारसंघातून आमदार झालो, असंही राणे म्हणाले.

वैभव नाईक हे ठाकरेंची साथ सोडून २०२४ मध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढणार होते, असा दावाही राणेंनी केला. तर नीलेश राणेंच्या दाव्यावर वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिंदेंनीच मला अनेकदा बोलावले होते, पण ठाकरेंशी गद्दारी करून मला आमदार व्हायचे नव्हते, असं नाईक म्हणाले.

शिंदेंसोबत न जाण्याचं नाईकांनी सांगितलं कारण...

नीलेश राणेंच्या दाव्यावर वैभव नाईक यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनी मला अनेकदा बोलावले होते; पण ठाकरेंशी गद्दारी करून मला आमदार व्हायचे नव्हते. म्हणून मी शिंदेसोबत गेलो नाही, असं नाईक म्हणाले. भरत गोगावले यांनी सुद्धा मला शिंदेसेनेत येण्यासाठी संपर्क साधला होता. पण मला गद्दारीचा कलंक नको होता. मात्र आमदारकीसाठी नीलेश राणे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन ते शिंदेसेनेत गेले, असा पलटवार नाईक यांनी केला.

नीलेश राणे हे पुन्हा आमदारकीसाठी भाजपमध्ये जातील आणि कुडाळमधून निवडणूक लढवतील, असा दावाही नाईक यांनी केला आहे. आता वैभव नाईक यांच्या आरोपांवर नीलेश राणे काय उत्तर देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळाच्या पाहणी दौऱ्याला दांडी; जिल्हाधिकाऱ्यांनी केज तहसीलदारांचा पदभार तडकाफडकी काढला

Maharashtra News Live Update: मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडासह जोरदार पाऊस

१ मेसेजचे १४ पैसे घेणार WhatsApp! १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम, तुमच्यावर काय परिणाम?

Skipping Dinner For Diabetes: रात्रीचे जेवण टाळल्याने डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो का? रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

SCROLL FOR NEXT